Home चंद्रपूर धारीवालमधील कामगार अधिकारी व कंत्राटदार अशा एकूण १५२ जणांनी केले विक्रमी रक्तदान

धारीवालमधील कामगार अधिकारी व कंत्राटदार अशा एकूण १५२ जणांनी केले विक्रमी रक्तदान

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चंद्रपूर व शासकीय रक्तसंकलन विभागांतर्गत बुधवारी रक्त शिबिर आयोजित घेण्यात आले. या वेळी पडोलीचे एपीआय राजकिरण मडावी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी धारीवाल कंपनीचे मुख्य महाप्रबंधक सोमेन बोरुआ, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाप्रबंधक अतुल गोयल, डॉ. अनिश नायर उपस्थित होते.

एपीआय राजकिरण मडावी यांनी कंपनीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सोबतच रस्तेसुरक्षासंदर्भात मार्गदर्शन केले रक्तदानामुळे व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे रकदान करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत बोरुआ यांनी व्यक्त केले. यावेळी कंपनीतील कामगार अधिकारी व कंत्राटदार अशा एकूण १५२ जणांनी रक्तदान केले. संचालन सहायक व्यवस्थापक धीरज ताटेवार यांनी केले. एच.आर. हेड दिनेश गाखर यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. आयोजनासाठी धारीवाल कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिश नायर, लीना पिरोडे, ज्ञानेश्वर लांडगे, संतोष काकडे, हर्ष तोमर, अमोल मुंजेवार, अरुण गडप्पा, संदीप गुहा, डॉ. मयूर कुळसंगे, प्रकाश पवार व वैद्यकीय कार्यालयाचे चमू यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here