कसं आहे मणिपूर राज्य? त्यां महिलांची कां काढली धिंड ? वाचून तुम्हीही थक्क राहाल.
लक्षवेधी :-
खरं तर राजकारण करणाऱ्यांनी चुकीचं काम करू नये, मानवी जीवन म्हणजे खेळणं नाही. सध्या केंद्रात आणि मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आहे. दोन्ही सरकारं काहीच करू शकत नाहीत? अशी परिस्थिती असतांना पुन्हा दोन महिलांना विवस्त्र करून सामूहिक धिंड काढल्या गेली व त्यां महिलांच्या प्रायव्हेट पार्टवर छेडखानी करून महिलांच्या भावना उद्विग्न केल्या. एवढेच नव्हे तर विदेशात या घटनांमुळे भारताची बदनामी झाली पण मोदी सरकार व मणिपूर सरकार हे दोन्ही सरकार काहीही करू शकत नाही हे पुन्हा एकदा शीद्ध झाल्याने शेवटी सर्वोच्य न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला एवढी भयंकर स्थिती मणिपूर ची झाली आहे.
3 मे रोजी हिंसाचार सुरु झाल्यापासून मणिपूरमध्ये 142 लोकांचा मृत्यू झालाय. जवळपास 60,000 लोक बेघर झाले आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, या हिंसाचारात जाळपोळीच्या 5000 घटना घडल्या आहेत. मणिपूर सरकारनं नुकतंच सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटलंय की, ‘हिंसाचाराशी संबधीत 5,995 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 6,745 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.’ पण परिस्थिती वेगळी आहे. तेथील लोकं सांगतात की आमच्याकडे सरकारच नाही. आमच्या बाजूनं उभं राहणारं कुणी नाही. आमच्या बाजूनं बोलणारं कुणी नाही.आमच्या बंधू भगिनींच्या जाण्याचा शोक इथं येऊन आम्ही व्यक्त करतोय, आम्ही न्यायाची मागणी करतोय. आम्हाला वाचावा… हा संदेश आम्ही जगाला देऊ इच्छितो.” मैतैई समाज कुकी समाज यांच्यामधला वाद हा हिंसाचाराचा प्रमुख मुद्दा असला तरी येथील भाजप सरकार व मुख्यमंत्री एन बीरेन सिंह हे यासाठी जबाबदार आहे असेच एकूण चित्र दिसत आहे.
कुकी समाजाची मोठी लोकसंख्या असलेल्या चुराचांदपूर परिसरात स्वतंत्र प्रदेशाची मागणी जोर धरू लागली आहे. तर काही लोकांनी ठिकठिकाणी चुराचंदपूर नाव पुसून टाकलंय आणि लमका असं लिहलंय. यामधील इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या संयोजक मेरी जोन्स म्हणतात,”आम्हाला चुराचांदपूरमध्ये पूर्णपणे स्वतंत्र प्रशासन हवं आहे, ते पूर्ण राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असू शकत. मला विश्वास आहे की, केंद्रसरकार विचारपूर्वक येथील आदिवासी लोकांसाठी काही मार्ग काढेलं.” पण दिवसागणिक परिस्थिती ढासळत आहे.
कसं आहे मणिपूर राज्य
मणिपूर राज्य हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिणेस मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील हे सर्वात मोठे शहर आहे. मणिपूर राज्याचे क्षेत्रफळ २२,३२७ चौ.किमी. एवढे आहे; लोकसंख्या २७,२१,७५६ एवढी आहे. मणिपुरी ही येथील प्रमुख भाषा आहे. मणिपूरची साक्षरता ७९.८५ टक्के आहे. तांदूळ, मोहरी व ऊस येथील प्रमुख पिके आहेत. ब्रिटीश भारतीय साम्राज्याच्या काळात मणिपूरचे राज्य एक संस्थान होते. १९१७ ते १९३९ च्या काळात मणिपूरमधील काही लोकांनी लोकशाहीसाठी संस्थानिकांवर दबाव आणला. १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात, मणिपूर राज्याने ब्रिटीश प्रशासनाशी बोलणी केली की, [[ब्रह्मदेशा] चा भाग होण्याऐवजी भारतीय संघराज्यायचाच भाग होण्याची अधिक इच्छा आहे. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे या वाटाघाटी कमी करण्यात आल्या. ११ ऑगस्ट १९४७ रोजी महाराजा बुधचंद्र यांनी भारतात सामील होण्याच्या एका साधनावर स्वाक्षरी केली. नंतर, २१ सप्टेंबर १९४९ रोजी त्यांनी विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली आणि ते राज्य भारतात विलीन केल्यामुळे ते भारताचे एक राज्य बनले. हे विलीनीकरण नंतर मणिपूरमधील गटांद्वारे विवादित झाले कारण एकमत न करता आणि कठोरतेने पूर्ण केले गेले. भविष्यासाठी हा वाद आणि भिन्न भिन्न दृष्टिकोन यामुळे भारतापासून स्वातंत्र्य मिळविण्याकरिता राज्यात ५० वर्षांच्या बंडखोरीचे तसेच राज्यातील वांशिक गटांमधील वारंवार होणाऱ्या हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. २००९ ते २०१८ पर्यंत, संघर्ष १००० पेक्षा जास्त लोकांच्या हिंसक मृत्यूंसाठी जबाबदार होता.
मणिपुरी लोक मणिपूर राज्यातील लोकसंख्येत सुमारे ५३% आहेत, त्यानंतर विविध नागा जमाती २४% आणि विविध कुकी-झो माती १६% आहेत. राज्याची मुख्य भाषा मणिपुरी आहे. आदिवासींची लोकसंख्या राज्यातील लोकसंख्येच्या जवळजवळ ४१% आहे. (२०११ च्या जनगणनेनुसार) आदिवासींची लोकसंख्या राज्यातील लोकसंख्येच्या जवळजवळ ४१% आहे. (२०११ च्या जनगणनेनुसार, हिंदू धर्म हा राज्यातील प्रमुख धर्म आहे, त्यानंतर ख्रिस्ती धर्म जवळपास आहे. इतर धर्मांमध्ये इस्लाम, सनामाही धर्म, बौद्ध धर्म, यहूदी धर्म (ज्यू धर्म), इत्यादींचा समावेश आहे.
मणिपूरमध्ये प्रामुख्याने कृषी अर्थव्यवस्था आहे, ज्यात महत्त्वपूर्ण जलविद्युत उत्पादन क्षमता आहे. ईम्फाळ विमानतळाद्वारे हे दररोजच्या विमानाने इतर भागात जोडलेले आहे, जे ईशान्य भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. मणिपूरमध्ये बऱ्याच खेळांचे मूळ स्थान आहे आणि मणिपुरी नृत्य हेसुद्धा मूळ आहे, आणि युरोपियन लोकांना पोलो परीचित करण्याचे दिले जाते.