ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन की साठगांठ?
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचा ऑनलाइन तिकीट बुकिंग घोटाळा नुकताच सामोरं आला असून यातील अभिषेक ठाकूर व रोहित ठाकूर यांच्या बुकिंग एजन्सी विरोधात रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे, चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन असे बुकिंग एजन्सी चे नाव असून या बुकिंग एजन्सी ने ताडोबात सुमारे 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार ताडोबातील विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलिसांत दिली होती
ताडोबातील विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांना या एजन्सीची पोलिसांत का तक्रार केली ? आतापर्यंत या एजन्सी ला कोणपाठीशी घालत होते ? या एजन्सीसोबत साठगांठ करणारे ते वन अधिकारी कोण आहेत? एका वन अधिकाऱ्याला सेवानिवृत्ती नंतर सुद्धा या तिकीट बुकिंग च्या देखरेखीत कां ठेवण्यात आले होते ? ठाकूर यांची अधिकृत वेबसाईट अजूनही बुकिंग कशी घेत आहे ? या व अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत आणि जर उत्तर मिळले तर आता तक्रारीत नमूद घोटाळ्याप्रकरणी काही वनाधिकारी सुद्धा अडकू शकतात एवढा मोठा घोटाळा झाला आहे.
वनाधिकारी यांच्या संगनमताने व मर्जीने ताडोबा ऑनलाईन तिकीट बुकिंग एजन्सी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनने गेल्या 3 वर्षात (10/12/21 ते 17/08/23 ) एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रक्कमे पैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा केला असल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे मात्र याही पेक्षा हा मोठा घोटाळा असून जर व्हीआयपी बुकिंग घोटाळा बाहेर आला तर पुन्हा खळबळ उडेल एवढा हा घोटाळा शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे वन विभागाची एवढी मोठी यंत्रणा असतांना एका खाजगी एजन्सीने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करावा यावर कोन विश्वास ठेवेल ? दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिषेक विनोदकुमार ठाकुर व रोहीत विनोदकुमार ठाकुर रा. प्लॉट क्र. 64 गुरुद्वारा रोड, चंद्रपूर यांच्याविरुद्ध कलम 420, 406 अन्वये फसवणुक व पैशाची अफरातफर करणारे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा योग्य तपास केला तर यात मोठे मासे गळाला लागतील असे चित्र असून या संदर्भात एक एक पुरावे सामोरं येत आहे.