महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या व जनसामान्यांच्या विविध समस्यांना घेऊन विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात सहभागी व्हा – डॉ. नामदेव किरसान.
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- मौजा पारडी (कुपी) ता. जि. गडचिरोली येथे बळीराजा नाट्यकला मंडळ पारडी च्या वतीने आयोजित “जानवर” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ.नामदेव किरसान यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात समाजाला व शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांची जाणीव करून देतांना सांगितले की, मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई व बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात सतत होणारी वाढ, त्या प्रमाणात शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ न होणे, आमदार खासदार अशा जनप्रतिनिधीमार्फत संसदेत व विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित न करणे, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, प्रत्येकाला पक्के घर देण्याचे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देण्याचे, काळा धन आणण्याचे व असे अनेक दिलेली आश्वासने पूर्ण न करणे, व स्थानिक समस्यांना घेऊन येत्या 11 डिसेंबरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे नागपूर येथे विधान भवनावर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून संजयभाऊ निखारे सरपंच ग्रा.प.पारडी उद्घाटक आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, दीपप्रज्वलक शिवसेना जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके,संदीप निखुरे, शेखर मुसली, विवेक मून, राजू पाटील जक्कंनवार,अशोक सोनुले,मयूर बोकडे, सुनीलभाऊ पोरेडीवार, घनश्याम मुरवतकर, दुधबावरे साहेब, लोंढे पाटील, किशोर गेडाम, चेतन गद्देवार, सूत्रपवार साहेब, प्रफुल् रामटेके, संबल बांबोळे, लक्ष्मीकांत कुंभारे, गुरुदास मोहुर्ले, अशोक ठाकरे, श्रीकृष्ण सिलोर,गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेसक उपस्थित होते.