रात्रीच्या वेळेस चोराट्यानी डाव साधून कापसाचा चुकाराच पळवला, पोलिसांचा शोध सुरु.
माढेळी प्रतिनिधी :–
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून घरफोडीचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले असले तरी चोरट्याना आवर घालण्यास त्यांना अपयश आले आहे, दरम्यान माढेळी परिसरात असलेल्या नवीन सोईट येथील शेतकरी प्रवीण झाडे यांच्या कापसाच्या चुकार्यावर डाका टाकून जवळपास 85 हजार रुपयाची रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली असून सहाय्य्क पोलीस अधीक्षक साटम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चोरांचा तपास सुरु आहे
कालच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोंडावार यांनी एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून पो.स्टें रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार असलेला आशिष श्रीनिवास रेडडीमल्ला वय २४ वर्ष रा. स्यत्तवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, चंद्रपूर यांला ताब्यात घेऊन लालपेठ कॉलरी चंद्रपूर येथील घरफोडी प्रकरणी बेड्या ठोकल्या व त्याचेकडून १) सोन्याचा (पिवळ्या धातुचे) गळयातील नेकलेस, वजन १७.८५० ग्रॅम, कि. ६५९५५/- रू २) कानातील सोन्याचे (पिवळया धातुचे) दोम टॉप्स ३.१२० ग्रॅम कि.११५००/- असे एकूण २०.९७ ग्राम असा एकुण ७७,४५५/-रू वा मुददेमाल जप्त केला. मात्र सोईट येथील शेताकऱ्यांच्या घरात चोरी झाली त्यात वेगळा तर्क लावल्या जात असून ज्यांना प्रवीण झाडे यांनी कापसाचा चुकारा आणला हे माहीत आहे अशाच चोरट्यानी चोरी केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतं आहे मग तो चोर घरचा किंव्हा जवळचा सुद्धा असू शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता या चोरीच्या घटनेचा पोलीस कसा शोध लावेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.