अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्रचे संचालक तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जेष्ठ नेते दिनेश भाऊ चोखारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी बल्लारपूर येथील सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे फळवाटप करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृद्धांसोबत भोजनचा आस्वाद घेत दीघायुष्यासाठी आशीर्वाद घेतला.त्यानंतर पोंभुर्णा आणि मूल येथेही फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोंभुर्णा येथील सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यातआली तर मूल येथीलहि सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यातआली.
या कार्यक्रमांमध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यावेळी बल्लारपूर काँग्रेस ग्रामीणचे तालुका अध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँग्रेस ग्रामीणचे महिला तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, बल्लारपूर काँग्रेस ग्रामीणचे महिला तालुका उपाध्यक्ष नाजुका आलाम, बल्लारपूर शहर सचिव ममता चंदेल, चांदपूरचे करण कुंभारे , इटोलीचे सरपंच तुळशीदास पिपरे, इटोलीचे उपसरपंच नरेश बुरांडे, मनोऱ्याचे विलास गव्हारे, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव पाटील येरगुडे, किन्हीचे वसंता आलाम, कोर्टी तुकूमचे राजू मेश्राम, कोर्टीमक्तता ग्रामपंचायतचे सदस्य मनोहर सोयाम, कोठारीचे अखील गेडाम, सुरेश चहारे, बल्लारपूरचे प्रीतम पाटील, याची उपस्थित होती.
…..
दिनेश भाऊ चोखारे यांनी उपस्थित सर्वांचे मानले आभार,
भद्रावती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जेष्ठ नेते दिनेश भाऊ चोखारे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी तालुकाध्यक्ष शंकर भाऊ खैरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कमलेश खामनकर, विशाल खैरे, आदर्श भाऊ आवारी, अमोल भाऊ खामकर, सुरज भाऊ मुसळे, सुरज रांजणकर , प्रणित बोरतवार, धीरज रांगणकर, निलेश भाऊ तिकट , धीरज खामकर, पिंटू भाऊ खामकर, श्रीकांत भाऊ जरीले ऋषिकेश भाऊ चटपलीवार, मोहन आगलावे , हरीश आवारी , शंकर भाऊ थेरे आदींची उपस्थिती होती. दिनेश भाऊ चोखारे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.