Home चंद्रपूर ब्रेकिंग:- अखेर चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला आमदार प्रतिभा धानोरकर यांना कांग्रेसची...

ब्रेकिंग:- अखेर चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला आमदार प्रतिभा धानोरकर यांना कांग्रेसची उमेदवारी.

विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात स्वतः प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी व्हायरलं केलेल्या त्या पत्रकाचा काय होईल परिणाम?

चंद्रपूर :-

मागील अनेक दिवसापासून मलाच उमेदवारी मिळावी असा हट्टाहास करणाऱ्या आमदार प्रतिभा धानोरकर यांची कांग्रेस चे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या मुलीच्या (शिवानी) उमेदवारीने वाट अडवून ठेवली होती, खरं तर भाजप उमेदवार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हरवन एवढं सोपं नाही त्यामुळे त्यांच्या तोलामोलाचा उमेदवार म्हणून विजय वडेट्टीवार यांनी लढावं अशी कांग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण विजय वडेट्टीवार हे कांग्रेस चे विरोधी पक्ष नेते व प्रचारक असल्याने त्यांच्याकडे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी आपल्या मुलीला समोर केले होते परंतु नवखा उमेदवार नको तुम्ही स्वतः लढत असाल तर तुम्हाला उमेदवारी देऊ अशी कांग्रेस निवड समितीची इच्छा होती, मात्र आपल्यावर पक्षाने टाकलेल्या जबाबदारीच चीज करावं या हेतूने त्यांनी या उमेदवारीवर पाणी सोडलं असावं वं त्यामुळेच ही उमेदवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांना मिळावी असावी अशी शक्यता वाटतं आहे. दरम्यान कांग्रेस उमेदवार कोण यावर शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवणाऱ्या कांग्रेस ने अखेर त्यावरचा सस्पेन्स काढून आमदार प्रतिभा धानोरकर यांना कांग्रेस ने उमेदवारी जाहीर केलेली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या अधिकृत प्रेसनोट द्वारा आज रविवारला जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून शनिवारी (23 मार्च 2024) उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत एकूण 46 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता तर महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून रविवारी (24 मार्च 2024) चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

आता पक्षांतर्गत राजकीय “पत्रक वार” काय होणार?

“चुकीला माफी नाही.” असं विजय वडेट्टीवार यांना आव्हान करणार पत्रक आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी काढून पक्षाच्या अंतर्गत राजकारणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली असल्याने विजय वडेट्टीवार गटाच्या कुणबी पदाधिकाऱ्यांनी त्या विरोधात एंडी हॉटेल येथे दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर समर्थकांचा समाचार घेतला होता व त्या पत्रकात “समस्त कुणबी समाज”असे आवाहन कर्ता म्हणून लिहिले होते, पण तो समाज नेमका कुठला आहे? याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता, काही कुणबी समाजाचे लोकं म्हणजे समाज नसतो आणि कांग्रेस पक्षात अमुक अमुक समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी प्रसारामाध्यमातून होतं नाही तर त्यासाठी पक्षाच्या निवडणूक निर्णय समितीकडे त्याविषयी लेखी द्यावं लागतं, शिवाय कांग्रेस पक्ष हा केवळ एका जातीचा नाही की त्याचं जातीला उमेदवारी द्यावी तर हा पक्ष सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांचा पक्ष आहे आणि म्हणूनच अल्पसंख्यांक संमाजाच्या नरेशबाबू पुगालिया यांना सुद्धा पक्षाने उमेदवारी दिली वं येथील जनतेने त्यांना निवडून दिले त्यामुळे अमुक जातीचा उमेदवार आहे म्हणून लोकं निवडून देत नाही तर त्या उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वावर मतदार निवडून देतात त्यामुळे त्या पत्रकात नमूद कुणबी समाजाचा उल्लेख हा कुणबी समाजाला बदनाम करणारा आहे असे पत्रकार परिषदेतून कांग्रेस च्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले होते, मात्र आता आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याने विजय वडेट्टीवार गट यांच्या असंतोशाने पक्षात अंतर्गत पाडापाडीस बळ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here