त्या बिअर बार ला दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉपी संचालकाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग गप्प, सेल टॅक्स विभाग पण झोपेत ?
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील असे अनेक बिअर बार संचालक आहेत ज्यांनी दारू पुरवठा करणाऱ्या सरकारी अधिकृत कंत्राटी कंपन्यांची उधारी दिली नसल्याने त्यांना दारू पुरवठा केल्या जात नाही, परंतु त्या बिअर बार चे संचालक वाईन शॉपी संचालक यांच्याकडून दारूच्या सगळ्या ब्रँड ची दारू विकत घेऊन त्याची विक्री बिअर बार मध्ये करत आहे, यामध्ये वरोरा भद्रावती येथील काही बिअर बार असून त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी का कार्यवाही करत नाही? हा मोठा प्रश्न असून सेल टॅक्स विभाग सुद्धा गप्प असल्याने या प्रकरणात कोट्यावधी रुपयाची दारू विक्री वाईन शॉपी कडून त्या बिअर बार मालकांनी केली त्यांचा लेखाजोखा लवकरच मोठा गौप्यस्फोटासह समोर येणार असल्याची माहिती आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भ्रष्ट अधिकारी संजय पाटील हें बिअर बार ला परवाना देण्याच्या नावाखाली एक लाख रुपये लाच मागण्याच्या प्रकरणात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असताना सुद्धा या विभागातील अधिकारी यांच्यात भ्रष्टाचार करण्याची सवय गेली नसल्याचे दिसत आहे, दरम्यान जिल्ह्यातील सर्व वाईन शॉपी, बिअर शॉपी, बिअर बार व देशी दारू दुकानदारांकडून हप्ता वसुली आजही या विभागाची सुरु असून ज्या बिअर बार ला कंपनीने दारू देणे बंद केले त्या बिअर बार ला वाईन शॉपी कडून बेकायदेशीरपणे दारू पुरवठा होतं आहे, त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याने या संदर्भात सेल टॅक्स विभागाची कार्यवाही अपेक्षित आहे अन्यथा ते बिअर बार व त्यांना साथ देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची पोलखोल व शासनाच्या कर चोरीचा मामला लवकरच पुराव्यासह उजेडात येणार आहे.