Home वरोरा खळबळजनक :- आमदार सुभाष धोटेना उमेदवारी मिळाली असती तर मुनगंटीवार घरी बसून...

खळबळजनक :- आमदार सुभाष धोटेना उमेदवारी मिळाली असती तर मुनगंटीवार घरी बसून निवडून आले असतें.

नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा जावई शोध? स्वतःपेक्षा धोटे वडेट्टीवार यांना कमी लेखल्याने कार्यकर्ते नाराज.

चंद्रपूर :-

ज्या व्यक्तीला एखादी गोस्ट परिश्रम न करता भाग्याने व वारसाहक्काने मिळाली की त्याला असं वाटतंय की ती गोस्ट माझ्या कर्तृत्वाने मिळाली आहे, अगदी असाच भ्रम नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांना झाला आहे, चंद्रपूर लोकसभा मतदार संघात जर आमदार सुभाष धोटे उभे असतें तर सुधीर मुनगंटीवार हें घरी बसून निवडून आले असतें असा जावई शोध करून त्यांनी जाहीरपणे आमदार धोटे यांच्या अपमान केला आहे. धानोरकर यांच्या मते त्यांच्यापेक्षा आमदार सुभाष धोटे हें कमजोर उमेदवार होते व आमदार सुभाष धोटे हें निवडून येऊ शकले नसते असं त्यांना म्हणायचं आहे. खरं तर ही एक धोटे यांची भर सभेत मानहानीचं असल्याने धोटे समर्थक संतापले आहे, दरम्यान सुभाष धोटे यांना आपल्या पक्षातीलचं नेत्यांनी सुपारी देऊन मला उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न केले असाही आरोप  आमदार विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता धानोरकर यांनी केला.

खरं तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा प्रतिभा धानोरकर खूप हुशार, उच्चशिक्षित आणि कर्तृत्वान आहे का? हा प्रश्न जर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या जनतेला विचारला तर ते म्हणतील की निश्चितचं नाही, कारण ज्या सुधीर मुनगंटीवार यांनी वयाच्या 17 व्या वर्षी महाविद्यालयाची निवडणूक लढवून राजकीय जीवनाला सुरुवात केली ते राज्याच्या अर्थमंत्री पदापर्यंत पोहचले त्या सुधीर मुनगंटीवार यांनी एम कॉम, एल. एल. बी. एम फील, डी. बी. एम, बी जे इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत, त्या तुलनेत प्रतिभा धानोरकर स्नातक पदवी पण घेतली की नाही हें सांगता येत नाही, मुनगंटीवार यांनी विधिमंडळ सभागृहात अनेक मुद्द्याना वाचा फोडून नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर अमरावती विद्यापीठाला संत गाडगे महाराज यांची नावे देण्यासाठी संघर्ष केला आणि विजय मिळवीला ते सुद्धा विरोधी बाकावर बसून असतांना, त्यांनी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आणण्याचा जो संघर्ष केला त्यात ते यशस्वी झाले, त्यांचा सर्वांसाठी जनता दरबार भरतो आणि समस्या घेऊन आलेल्या शेवटच्या व्यक्तीला सुद्धा ते भेटतात तर दुसरीकडं धानोरकर यांच्याकडे लोकं जातात आणि परत येतांना काय म्हणतात हें सगळ्यांनाचं माहीत आहे, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या पेक्षा मी मोठी आहे आणि माझं कर्तृत्व हें सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा मोठं आहे हा जो टेंभा त्या मिरवीत आहे हें त्यांच्या अज्ञानपणाचा भाग आहे, जनतेने त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं ते व्यक्तिगत धानोरकर आहे म्हणून नव्हे तर मोदी नको म्हणून आणि महागाई बेरोजगारी यासह शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव नाही या भावनेने जनतेने पर्याय म्हणून कांग्रेस ला मतदान दिलं हें त्यांनी समजून घ्यायला हवं. जर प्रतिभा धानोरकर अपक्ष उभ्या असत्या तर कदाचित त्या तिसऱ्या स्थानावर असत्या पण जनतेने कांग्रेस हा पर्याय निवडला त्यामुळे कांग्रेस कडून आमदार सुभाष धोटे जरी उमेदवार असतें किंव्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार जरी असत्या तरी त्या कांग्रेस च्या तिकिटावर निवडून आल्या असत्या त्यामुळे धानोरकरांनी स्वतःपेक्षा पक्ष मोठा असतो हें सत्य स्वीकारलं पाहिजे असं सुज्ञ नागरिकांना वाटतंय.

सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेस महाविकास आघाडी सत्तेत असतांना विरोधात राहून सरकारला अनेक निर्णय घेण्यास भाग पाडले, अभ्यासू, हजरजबाबी आणि उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे, त्या तुलनेत प्रतिभा धानोरकर यांचं कर्तृत्व काय? तर कुठल्याही कार्यकक्षेत न बसणारं असंच आहे, पण मोदी विरोधी लाट आणि राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाचा जनतेत असलेला संताप यामुळे यावेळी कांग्रेसलाच मतदान करायचं हा निर्णय जनतेनी घेतला, त्यात विचारवंत डाॅ.विश्वंभर चौधरी आणि अँड असीम सरोदे यांनी “निर्भय बनो,” मोदीचं सरकार आलं तर ते संविधान बदलून टाकेन हें जे अभियान राबवलं व चंद्रपूर वणी आर्णी येथील शहरात व मोठया गावात सर्वत्र सभा लावल्या त्यामुळे कांग्रेस चा कुठलाही मोठा नेता प्रचाराला आला नसताना ही निवडणूक ह्या विचारावंतांनी जनतेच्या हातात दिली आणि त्यामुळे घराघरात, दारादारात लोकं गावाच्या उंबरठ्यावर बसून मोदी सरकारची महागाई व बेरोजगारी यावर चर्चा करू लागले आणि जनमत बनून कांग्रेस उमेदवाराला भरभरून मतदान झालं हें कुणीही नाकारू शकत नाही, त्यात भर म्हणजे मुनगंटीवार यांनी 1984,च्या शीख दंगली चा उल्लेख करून जे बहीण भाऊ यांच्यावर भाष्य केले तो संदर्भ घेऊन कांग्रेस च्या सभामधून व चर्चेतून जो मुनगंटीवार विरोधात प्रचार झाला आणि सुधीर मुनगंटीवार हें निवडून आले तर दारूबंदी होईल असा प्रचार जो करण्यात आला त्यामुळे मुनगंटीवार हरले, त्यात भाजप च्या आयटी सेल च्या लोकांनी काम केले नाही केलं नाही त्यामुळे सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांना फटका बसला हें त्रिकालाबाधित सत्य आहे, पण धानोरकर यांचा विजय म्हणजे जणू त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळविलेला विजय आहे अशा बेगडी अविर्भावात वावरून धानोरकर यांनी स्वतःच्या पक्षातील आमदार सुभाष धोटे आणि कांग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ असल्याचा जणू दावा केला आहे, एवढेच नव्हे तर चंद्रपूर लोकसभेच्या क्षेत्रातील विधानसभेचे उमेदवार मीच ठरविणार हा हुंकार त्यांनी भरला असल्याने त्यावर कांग्रेस मध्ये काय विचार मंथन केले जाते हा येणारा काळचं ठरवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here