Home चंद्रपूर दखलपात्र :- डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्यावर चुकीची ट्रीटमेंट प्रकरणी हत्तेचा गुन्हा दाखल...

दखलपात्र :- डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्यावर चुकीची ट्रीटमेंट प्रकरणी हत्तेचा गुन्हा दाखल करा.

दहा वर्षीय श्री मुरकुटेच्या दुर्दैवी मृत्यूस डॉ गावतूरे जबाबदार, राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी यांनी केली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार.

चंद्रपूर :-

सध्या डॉक्टरांना देव मानायचं की यमदूत हेच मुळात कळायला मार्ग नाही, कारण जिथे देवासारखा विश्वास डॉक्टरांवार ठेऊन बिमार लोकं डॉक्टरांकडे उपचार करायला जातात तिथे पैशाखातीर काय काय उपचार केले जाईल हें ब्राम्हदेवाला सुद्धा कळणार नाही, काही डॉक्टर तर “जखम हाताला आणि उपचार डोक्याला,” अशा कारामती सुद्धा करतांना दिसतात, दरम्यान चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध डॉ. अभिलाषा गावतूरे ह्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कांग्रेस उमेदवाराच्या प्रचारात अग्रेसर होत्या व त्यांनी कांग्रेस मध्ये प्रवेश घेतला त्यामुळे जणू त्यांना पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आमदार होण्याचे डोहाळे लागले होते, पण राजकारणात पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न कदाचित त्यांच्या मानसिक स्थितीला बदलून टाकणारा ठरणार आणि त्यांच्या हातून एका निरापराध दहा वर्षीय श्री चा जीव जाणार हें त्यांना सुद्धा कळालं नसावं, कारण राजकारणाची हवा डोक्यात गेल्यावर माणूस आपल्या स्वतःच्या दैनंदिन व्यवसायावर तेवढा प्रामाणिक नसतो जेवढा असायला हवा आणि त्यातूनच मग अनर्थ होतो, तसाच प्रकार डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्या बाबतीत घडला आणि त्यांच्या राजकीय मानसिक स्थितीचा एक दहा वर्षीय श्री मुरकुटे बळी ठरला पण जो निरापराध श्री याचा डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्या चुकीच्या निर्णयाने जीव गेला ती गोस्ट माफ कारण्यासारखी नसून डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्यावर हत्तेचा गुन्हा दाखल करा अन्यथा amhi आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी संजय कन्नावार व जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या कस्तुरबा रोडवर असलेल्या रुग्णालयात विठ्ठल मंदिर वार्डातील श्री मुरकुटे या दहा वर्षीय मुलाची प्रकृती दिनांक 15 जून रोज रविवारला अचानक बिघडल्याने त्याला सकाळी जवळपास 8.00 च्या दरम्यान भरती करण्यात आले होते. दरम्यान मुलाचे वडील आई आणि शेजारी असणाऱ्या राहुल देवतळे यांनी डॉ, अभिलाषा गावतुरे यांना सांगितले होते की पहाटे तीन च्या दरम्यान मण्यार नावाचा साप बेडवर वडिलांच्या पायावरून गेला व तो साप सर्पमित्र यांनी पकडला त्यामुळे मुलाला सापाचा दंश पण होऊ शकतो त्या दिशेने उपचार करा पण डॉक्टरांनी तसे न करता मुलाची प्रकृती अस्वस्थ असतांना व तो मुलगा तडफडत असतांना त्याला गळ्याचा टॉन्सिल झाला असे सांगून नर्सेस च्या भरोशावर त्या मुलाला सोडून डॉ गावतूरे ह्या पाळीव कुत्रा घेऊन बाहेर फिरायला गेल्या, या दरम्यान पुन्हा मुलाची प्रकृती बिघडली आणि मुलगा मरण्याच्या दारात पोहचला, दरम्यान एका तासानंतर डॉ गावतुरे यांनी मुलाला बघितले व त्या घाबरल्या आणि त्या नर्सेसला म्हणाल्या की तुम्ही हें काय केलं? आणि त्यांनी लगेच मुलाच्या वडीलाला बोलावून मुलाची प्रकृती बिघडली आहें त्याला बाहेर हलवा लागेल आणि त्यानी ऍम्ब्युलन्स बोलावून डॉ. वासाडे यांच्याकडे तात्काळ भरती केले, मात्र वेळ निघून गेला होता आणि त्याचं दरम्यान निरागस निरापराध श्री मुरकुटे या दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पण आपल्यावर याची जबाबदारी येऊ नये म्हणून डॉ. गावतुरे यांनी जाणीवपूर्वक डॉ. वासाडे यांच्याकडे त्याला नेऊन स्वतःवरची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला खरा, पण श्री वर योग्य असा सर्प दंशाचा उपचार झाला असता तर कदाचित श्री चा मृत्यू झाला नसता, यावरून डॉ अभिलाषा गावतुरे ह्याच श्री च्या मृत्यूस जबाबदार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हायला हवी अशी मागणी मुरकुटे परिवाराकडून होत आहे.

डॉ. अभिलाषा गावतुरे कशा आहेत दोषी?

खरं तर एखादा साप एखाद्याला दंश करतो तेंव्हा तो साप नेमका कुठला आहे हें डॉक्टरांना माहीत करून घेणे आवश्यक आहे, कारण साप हें अनेक प्रकारचे असतात, विषारी व बिनविषारी पण साप असतात त्यातही एका जातीच्या अनेक प्रजाती सुद्धा असतात त्यात मण्यार ह्या साप जातीच्या चार प्रजाती असून त्या विषारी आहे व त्या सापाचा दंश झाल्यास तर कधी संबंधित व्यक्तीला माहीत पण होत नाही मात्र त्याचे लक्षण जसे त्या सापाच्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो व त्यामुळे मेंदूचे कार्य अनियंत्रित होते व डोक्यात दुखायला लागतं श्वास घ्यायला अडथळे निर्माण होते घसा कोरडा पडतो व घश्यात त्रास व्हायला लागतो, हें सर्व लक्षण डॉ. गावतुरे यांच्या रुग्णालयात भरती केलेल्या श्री च्या बाबतीत दिसत असतांना डॉ गावतुरे यांनी त्या दिशेने उपचार न करता टॉन्सिल चा प्रकार आहे हें समजून उपचार केला आणि सर्पदंशाचा उपचार वेळीच मिळाला नसल्याने श्री मुरकुटे या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला हें सत्य आहे, दरम्यान आता डॉ. गावतुरे ह्या खोटं बोलताहेत की रुग्णाच्या परिवाराने मला साप दंश झाल्याचे सांगितले नाही पण याबाबतीत विठ्ठल मंदिर वार्डातील अनेक लोकं प्रत्यक्षादर्शी साक्षदार असून डॉ. गावतुरे यांच्यावर कार्यवाही होऊन त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे व त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संजय कन्नावार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here