Home वरोरा दखल :- बी. एस. इस्पात कंपनीवर इडीच्या पथकाची धाड, काय सापडलं घबाडं?

दखल :- बी. एस. इस्पात कंपनीवर इडीच्या पथकाची धाड, काय सापडलं घबाडं?

शेकडो तरुणांचा रोजगार हिरावून कोळंशाच्या काळ्या कमाईत मस्त वावरणाऱ्या कंपनी संचालकांचा पर्दापाश?

वरोरा : –

जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील मजरा परिसरात असलेल्या बी. एस. इस्पात कंपनी व्यवस्थापनाच्या भ्रष्ट प्रतापामुळे अखेर इडीच्या पथकाने काल गुरुवार दि. २० जून रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकून चौकशी सुरु केली, दरम्यान आजपर्यंत प्रशासनाला अंधारात ठेवणाऱ्या व कोट्यावधी रुपयांचा कोळसा घोटाळा करून व या माध्यमातून कित्तेकांची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बिएस इस्पात कंपनीच्या संचालकांची चौकशी सुरु केली आहे. ही कार्यवाही कोळशाची हेराफेरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून ईडी मार्फत सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वरोरा तालुक्यातील मजरा परिसरात असलेल्या बी. एस. इस्पात कंपनीत स्पंज आयरन निर्मानीचा उदधोग आहे, या कंपनीत मजरा व परिसरातील जवळपास चारसे तरुण बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात आला होता मात्र ही कंपनी मागील दहा वर्षांपासून बंद असून मधात ही कंपनी सुरु करण्यात आली होती आणि तीनसे च्या जवळपास परिसरातील युवकांना रोजगार मिळाला होता परंतु या कंपनीच्या मशिन्स व जुन्या झाल्या असल्याने ही कंपनी जास्त दिवस चालू शकली नाही पर्यायाने ती पुन्हा बंद करण्यात आली आणि शेकडो लोकांचा रोजगार गेला, दरम्यान या कंपनीला कोळसा पुरवठा करण्यासाठी वणी तालुक्यातील मारकी- 3 मुकुटबन येथे कोलबेल्ट केंद्राकडून मंजूर करण्यात आला होता व या कंपनीला 10 हजार टन कोळसाची आवश्यकता असल्याचे कागदोपत्री ठराविण्यात आले होते, मात्र मागील जवळपास 10 वर्षांपासून बिएस इस्पात कम्पनी बंद असून कोळसा खाणीतून जो कोळसा बिएस इस्पात कंपनीत पाठविण्याच्या नावाखाली तो कोळसा खुल्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा सुरु होता, दरम्यान या कोळसा खाणीच्या उत्पादनात भागीदारी देऊ, त्यासाठी गुंतवणूक करा अशी लालच देऊन नागपूर येथील दोन व्यापाऱ्यांना या कंपनी संचालकांनी कोट्यावधी रुपयांनी फसवल्याने यांच्या विरोधात नागपूर येथील पोलीस स्टेशनं मध्ये फसवणूकीचे गुन्हे दाखल आहे. अशातच कोळशाची हेराफेरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांची ईडी चौकशी सुरु आहे आणि त्या संदर्भात काल ईडी ची रेड मजरा येथील बिएस इस्पात कंपनीवर पडली आहे.

मजरा येथील स्पंज आयरन कंपनीच्या नावाखाली कोल बेल्ट मात्र कोळसा खुल्या बाजारात ?

वरोरा तालुक्यातील मजरा येथील बिएस इस्पात कंपनीला कोळसा पुरवठा करण्याच्या नावाखाली तालुक्यातील मुकुटबन येथे कोळसा खाण मंजूर झाली होती मात्र मजरा येथील बिएस इस्पात कंपनीत कोळसा येत असल्याचे दाखवून हा कोळसा वणी तालुक्यातील भालर रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या इंडोयुनिक फ्लेम लिमिटेड या कोल वॉशरी कंपनीत जात होता, हा कोळसा स्वच्छ करून करण्यासाठी देण्यात येत होता असे सांगण्यात येते मात्र या कंपनी संचलकांसोबत साठगांठ करून हा कोळसा खुल्या बाजारात विकल्या जात होता हें स्पष्ट होते व त्या बदल्यात इंडोयुनिक फ्लेम लिमिटेड कंपनी संचालकांनी बिएस इस्पात कंपनी संचालकांना काही कोटी रुपये दिले होते, मात्र काही पैसा स्वतः ठेऊन घेतला आणि त्यांचा हिशोब न झाल्याने दोघात वाद झाला होता. माहितीनुसार बी. एस. इस्पात आणि कोल वॉशरी मध्ये झालेल्या करारानुसार 6 मार्च 2022 ते 19 जून 2022 दरम्यान 41271.14 मॅट्रिक टन कोळसा कोल वॉशरी कडे स्वच्छ करण्यासाठी पाठविण्यात आला होता. परंतू त्यापैकी 25031.77 मॅट्रिक टन कोळसा कोल वॉशरीने बी. एस. इस्पातला परत केला नाही असे बी. एस. इस्पात कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, परंतु बी.एस. इस्पात कंपनीच्या संचालकांनी शासनाची कोट्यावधी रुपयाची रॉयल्टी बुडविली आहे, व ह्याच बिएस इस्पात कंपनीच्या कोळसा खाणीतून रॉयल्टी बुडवून तो कोळसा कोल वॉशरी कंपनी मध्ये नेत असतांना पोलिसांनी पकडला होता त्या संदर्भात वणी येथे पोलीस केस आहे, दरम्यान कोल वॉशरीमधून कोळसा गायब असल्याने कोळसा वॉशरीने कोळशाची परस्पर विल्हेवाट लावून बी.एस. इस्पात कंपनीची फसवणूक केली असे दाखवून 28 डिसेंबर 2023 रोजी यासंदर्भात वरोरा पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. यानंतर बी. एस. इस्पात नी कंपनीचे उपाध्यक्ष सागर कासनगोट्टावार यांनी दिनांक 6 मे 2024 रोजी पुन्हा या संदर्भात ना पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली. त्यामुळे वरोरा पोलिसांनी कोल वॉशरी संचालक विपुल चौधरी यांचे विरुद्ध 10 कोटी 1 लाख 28 हजार रुपयांच्या कोळशाची अफरातफर केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

बिएस इस्पात कंपनी संचालकांकडून अनेकांची फसवणूक?

बीएस इस्पात कंपनीच्या संचालकांनी मुकुटबन येथे जी कोळसा खाण मंजूर करून घेतली त्यात त्यांनी अनेकांकांडून कोट्यावधी रुपये गुंतवणूक म्हणून घेतले दरम्यान दोन कोळसा व्यापाऱ्यांची गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक केल्या प्रकरणी नागपूर येथील पोलीस स्टेशनं येथे फसवणूकीचे गुन्हे दाखल आहे, दरम्यान अशाच एका प्रकरणात एक आठवड्यापूर्वी अग्रवाल नामक व्यक्तीला अटक झाली असल्याचे सांगितले जाते. यामुळे एकूणच या कोळसा हेराफेरी प्रकरणातून झालेला आर्थिक व्यवहार आणि फसवणूक याच कारणाने इडीच्या पथकाने काल ही धाड टाकली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता या ईडी चौकशीत ईडी पथकांच्या हातात बिएस इस्पात कंपनी च्या कार्यालयात काय काय दस्तावेजाचे घबाड हाती लागते हें पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here