Home क्राईम स्टोरी

मनसे सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार करणाल्या दोन युवकाना अटक

चंद्रपूर :- ४ जुलै रोजी चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे भरदिवसा मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार झाला होता, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावन्यात आलेली आहे.

सदाशिव उर्फ सिद्धू अशोक वाघमारे रा. कोरपना, प्रफुल्ल उर्फ टिल्लू सातघरे रा. मोरवा, असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे प्रकरण एलसीबीकडे सोपवण्यात आल्यानंतर शनिवारी उमरेड पोलिसांच्या मदतीने दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली.

दोन्ही तरुणांनी उमरेड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही २१ वर्षीय तरुण गुन्हेगार प्रवृत्तीचे असून यापूर्वी खून व विनयभंगाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेले आहेत. दोन्ही आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहे. या दोन्ही तरुणांच मनसेचे अमन अंदेवार यांच्याशी वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here