Home Breaking News भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल : सुधीर मुनगंटीवार

भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल : सुधीर मुनगंटीवार

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल : सुधीर मुनगंटीवार

भाजपा वचननामा समितीची प्रदीर्घ बैठक संपन्न

मुंबई  :-  दि. २१ ऑक्टोबर २०२४ आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे प्रतिपादन ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. भाजपाच्या वचननामा समितीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर ते बोलत होते.

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला वचननामा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री मंगलप्रभात लोढा, श्री दिलीप कांबळे, श्री मधु चव्हाण, ॲड.श्री उज्ज्वल निकम, श्री पाशा पटेल, श्री राजेश पांडे, डॉ. भारती पवार, श्रीमती नीता केळकर, श्रीमती माधवी नाईक, श्री सुरेश हावरें, श्री लद्धाराम नागवानी, , श्री लक्ष्मण सावजी, श्रीमती स्मीता वाघ, श्री अमोल जाधव, श्री अनिल सोले, श्री दयानंद तिवारी, श्री क्रण पातुरकर, श्री मिलिंद तुळसकर आदी प्रमुख नेते सहभागी होते.

News reporter :- अतुल दिघाडे

या बैठकीत उपस्थित नेत्यांनी वचननाम्यात समाविष्ट करण्याच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. आजवर मतदारांकडून व विविध विषयातील तज्ञांकडून प्राप्त झालेल्या सूचनांवरही सांगोपांग चर्चा झाली. भाजपाचा हा वचननामा सामाजिक जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारा, सर्व घटकांचे समाधान करणारा असा सर्वसमावेशक असावा यासाठी वचननामा समिती प्रयत्नशील आहे असेही ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

लोकनेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याची प्रत्येक नागरिकाला ही संधी असून नागरिकांकडून या वचननाम्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करीत आहोत, असेही ना. श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आपल्या सूचना आपण visionformaharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा पत्राद्वारे अथवा 9004617157 या व्हॉट्सअप वर लवकरात लवकर पाठवाव्यात अशी विनंती त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या नागरिकांना केली आहे.

तर भाजपा प्रदेश कार्यालयातही वचननाम्यासंदर्भात नागरिकांच्या सूचना स्वीकारण्याकरता एक पेटी ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here