Home चंद्रपूर ज्याचा घरातील अंगणात पराभव होतो तो रणांगणात टिकत नाही, मूल्यवर्धन मेळाव्यात पाटील...

ज्याचा घरातील अंगणात पराभव होतो तो रणांगणात टिकत नाही, मूल्यवर्धन मेळाव्यात पाटील यांचे प्रतिपादन !

मेळाव्यात जिल्हापरिषद व नगरपरिषद, महानगरपालिका शाळेतील शिक्षकाची भरगच्च उपस्थिती!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राज्य शासनाच्यावतीने मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था च्या ६७००० शाळांमध्ये सुरू आहे. शांतीलाल मुथा फाउंडेशन या संस्थेने कामाची निर्मिती केली. इ. स. सन २००९ ते २०१५ ह्या सहा वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या पाचशे शाळांमध्ये यशस्वीरित्या कार्यक्रम राबविला गेला होता, आता तो महाराष्ट्रातील संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधे राबविल्या जात आहे, शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावे, त्यांना संविधानातील न्याय, स्वतंत्रता, समानता व बंधुत्वता ही मूल्ये विद्यार्थ्यांदशेतील पहिल्या वर्गापासून त्यांच्यात रुजावे. बालस्नेही व विद्यार्थी केंद्रिय पद्धतीने आनंददायी वातावरणामध्ये सहयोगी अध्ययन व ज्ञान रचना याद्वारे शिक्षण पद्धतीचा वापर करून देणे, विविध कृती वर्ग उपक्रम, शालेय उपक्रम याद्वारे सातत्याने आणि सुनियोजित रीतीने उपलब्ध करून देणे ही मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना आहे. या मूल्यवर्धन मेळाव्याचे आयोजन स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात दिनांक १२ मार्चला सकाळी ९,३० वाजेपासून करण्यात आले होते, या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पाटील यांनी म्हटले की विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आपल्याला मूल्य संवर्धन करण्याची आवश्यकता आहे कारण ज्यांचा घरातील अंगणात पराभव होत असतो तो रणांगणात कधीही विजयी होऊ शकत नाही आणि म्हणून बालपणापासून जर मुलांवर मूल्य संवर्धनाचे संस्कार रूजवले तर तो विद्यार्थी आपल्या कुटुंबासोबतच समाज घडवू शकतो, या मेळाव्याला जिल्ह्यातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते . बरेच शिक्षकांनी शिक्षण पद्धतीत काय बदल करायचे यावर चर्चा करण्यात केली.
शांतीलाल मुथ्था फाउंडेशन, राज्य शासनास कामासाठी सर्वतोपरी विनामूल्य सहकार्य करीत आहे. गेल्या चार वर्षापासून या कार्यक्रमाचे पायाभूत संरक्षण व मूल्यमापन अनेक वेगवेगळ्या संस्थांनी केले आहे. मागील वर्षी 65000 वर्ग निरीक्षण करण्यात आली आहेत. या सर्वांचे अहवाल अतिशय सकारात्मक असून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन होताना दिसत आहे.
या संस्थेमार्फत खाजगी शाळांना सुद्धा जूनअखेरपर्यंत मूल्यवर्धन संकल्पना जोडण्याचे आमचे प्रयत्न आहे. असे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. शांतीलाल मुथ्था, लोखंडे सर, पाटील सर, अशोक संघवी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमहाकाली कॉलरी येथून दारूमाफिया अमित गुप्ताची पकडली दारू ,
Next articleअन्यायकारक :-मानीकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारी वरुण आदीवासीवर गुन्हे दाखल ! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here