Home कोरपणा अन्यायकारक :-मानीकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारी वरुण आदीवासीवर गुन्हे दाखल ! 

अन्यायकारक :-मानीकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारी वरुण आदीवासीवर गुन्हे दाखल ! 

पोलीसाच्या एकतर्फी भुमिकेवर शंका !

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

माणिकगड सिमेंट कंपनी आदिवासी जमीन प्रकरण दडपून टाकण्यासाठी खोट्या माहितीच्या आधारे चुकीच्या खोट्या तक्रारी पोलिसात करून वेळोवेळी आदिवासी गरीब कुटुंबावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे, खरं तर पोलिसांचा दुरुपयोग करून आदिवासींच्या मनात भीती निर्माण करून खोट्या गुन्ह्यात आदिवासींना अडकविण्याचा प्रयत्न कंपनी प्रशासन करीत आहे सोबतच पोलीसांचा ससेमिरा लावण्याचा एकतर्फी उपक्रम राबवून निर्दोष व घटनेशी संबंध नसलेल्या आजारी व्यक्तींच्या नावाने खोट्या तक्रारी करून आंदोलनकर्त्यांना सूडबुद्धी व हेतुपुरस्सर पोलिसांचा वापर करून कंपनीने आदिवासी व शासनाची केलेली फसवणूक व करण्यात आलेली दिशाभूल व नियमबाह्य करारनामे व व्यवहार उघड होऊ नये याकरिता सुरू आहे,  त्यामुळे आंदोलनकर्त्याचे  संविधानिक मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी कंपनी गडचांदूर पोलिसांचा वापर करून खोट्या आरोपात आदिवासी कुटुंब व आंदोलनकर्त्यांवर चार पाच गुन्हे दाखल करून अन्याय केला आहे यामुळे आदिवासी कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आदिवासी कुटुंब अन्याय व अत्याचाराचे चटके सहन करीत आहे, मात्र आदिवासींच्या जमिनी बळकावल्या,  रस्ता बंद केला,  पिण्याच्या पाण्याचा अधिकार हिरावला याबाबत पोलीस विभागात महसूल विभागात तक्रारी दाखल करून सुद्धा  एकही गुन्हा कंपनी विरोधात दाखल करीत नाही यामुळे पोलिसांच्या एकतर्फी कारवाईने आदिवासींमध्ये शंका निर्माण झाली आहे सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी कंपनी व्यवस्थापन अधिकारी खोट्या तक्रारी करून मानसिक छळ व घातपात करून आंदोलनकर्त्यांना व आदिवासी यांच्‍या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार गडचांदूर पोलिसात करून कारवाईची मागणी व खऱ्या दोषींवर कारवाई करून निष्पाप आदिवासींचा छळ थांबवण्याची मागणी गृहमंत्री पालकमंत्री पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली असून तात्काळ आदिवासी कुटुंबाचा छळ थांबवा अशी मागणी केली आहे सतत सुरू असलेल्या कारवाईमुळे आदिवासी मध्ये असंतोष वाढत असून या अन्यायाविरुद्ध उद्रेक उफाळून येण्याचे वातावरण निर्माण झाले असून आदिवासी समाजामध्ये एकतर्फी कारवाई चे पडसाद गावागावात पडल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे गडचांदूर शहरामध्ये देव कुळमेथे यांच्या अन्यायाबद्दल कंपनीविरुद्ध गावकऱ्यांमध्ये तीव्र भावना दिसून येत आहे

Previous articleज्याचा घरातील अंगणात पराभव होतो तो रणांगणात टिकत नाही, मूल्यवर्धन मेळाव्यात पाटील यांचे प्रतिपादन !
Next articleकोरपना येथे शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाेके यांची जयंती निमित्त रैलीचे आयोजन ! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here