Home आंतरराष्ट्रीय कोरोना व्हायरस च्या भितीने चंद्रपूर महाकालीची यात्रा रद्द !

कोरोना व्हायरस च्या भितीने चंद्रपूर महाकालीची यात्रा रद्द !

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने यात्रा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

मध्य भारतातील सर्वात पुरातन तीर्थस्थळ असलेल्या महाकाली देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते.
मात्र यंदा गुडीपाडव्यापासून सुरु होणारी हि चैत्रातील महाकाली यात्रा जिल्हाधिकारी यांनी कोरोना व्हायरसच्या संभावित धोक्यामुळे रद्द केली आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस च्या आक्रमणांमुळे मोठी महामारी होत आहे, आणि या कोरोनाने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केल्याचं आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी लोक जमून चुकून कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने महाकाली मंदिर ट्रस्ट सोबत मिळून हा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत असे आदेश राज्यसरकारने दिले होते . अश्यातच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यातील सर्वात मोठी होणारी महाकाली यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशातच पुणे, मुंबई आणि नागपूर मध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे.सध्या महाराष्ट्रात एकूण 11 कोरोना बाधीत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशा तच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

यंदाच्या महाकाली यात्रा गुडीपाडव्यापासून प्रारंभ होणार होता,मात्र कोरोनाच्या भीतीमुळे हि यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्ह्या प्रशासनाने घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी माध्यमांना दिली.
या महाकाली यात्रा महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील देखील भाविक येतात,तेव्हा खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर मंदिर परिसरातील दुकानदार देखील या यात्रेच्या तयारीला लागले होते,यात्रेच्या सामानासह अनेक वस्तूंचे दुकान देखील या मंदिर परिसरात लागतात त्या दुकानदारांनी येणाऱ्या यात्रेसाठी आपल्या दुकानात सामान भरण्यासाठी पाण्याची जुडवा जुडवा केली, मात्र यात्रा रद्द होण्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर निराशा बघायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here