Home वरोरा बोर्डा येथे जागोजागी घाणेरड्या पाण्याच साम्राज्य ? नागरिकांनी पत्करला उपोषणाचा मार्ग ! 

बोर्डा येथे जागोजागी घाणेरड्या पाण्याच साम्राज्य ? नागरिकांनी पत्करला उपोषणाचा मार्ग ! 

ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ! कुणी या परिसरातील व्यक्ती दगावले तर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

येथील वरोरा तहसील मध्ये येथे असलेल्या बोर्डा ग्रामपंचायत द्वारकानगरी परिसरातील रहिवाशी हे परिसरात ग्रामपंचायतीच्या नकाशानूसार नाली व रस्ता न बांधल्यामुळे व परिसरातील उपद्रवी रजनी लांबट व त्यांच्या शाळेच्या व्यवस्थापन मंडळामुळे सदर परिसरात सांडपाण्याने रस्ते तुडुंब भरलेले असल्याने  तसेच जागोजागी घाणेरडे पाणी साचून दुर्गधी पसरली आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व सापांचा सूळसूळाट झाला असल्याने कंटाळले आहेत.सदर प्रकरणात समस्येचा पाठपुरावा परिसरातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे  करीत आहे परंतू याप्रकरणात लिटील एंजल शाळेच्या जागेची मालकीन ही कोर्टात जावून तिने रस्ता अडवून धरला आहे व त्यामुळे घाणिचे साम्राज्य चारही बाजूनी पसरले आहे. संबंधीत सर्व प्रशासकीय यंत्रणांना येथील नागरिकांनी वारंवार आरोग्याची निर्माण झालेल्या समस्येविषयी जाणीव करून दिली. त्याचा पाठपुरावा नागरिक मागील ५ वर्षापासून करीत आहेत. तसेच परिसरातील मुलाबाळांचे आजाराचे, रक्ताची तपासणी केलेले. कागदपत्र व डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया, काविळ, टायफाईड यासारख्या जीवघेण्या आजाराचे सर्टीफिकेट, Blood Report सादर केल्यावरही प्रशासन जागे न झाल्याने परिसरातील नागरिक दि. ३ मार्च २०२० पासून बेमुदत उपोषणाचा लोकशाही मार्ग स्वीकारून उपषणास बसली आहेत. पहिल्या दिवशी प्रशासनाचे शिष्टमंडळ परिसरातील जागेचे अवलोकन करण्यास गेली असता तात्पुरता कुठलाही मार्ग निघू शकत नाही तसेच कोर्टात रजनी लांबट विरूध्द स्टेट व इतर या प्रलंबित न्याय प्रकरणामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही हतबल आहोत असा पवित्रा संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याने येथील उपोषणकर्ते नागरिक  आश्चर्यचकीत झाले, तरीही कोर्टात सुरू असलेल्या या प्रकरणाची पुढील तारीख ४ एप्रिल २०२० अशी लांबणीची तारीख ग्रामसचिवांनी घेतली आहे.
उत्तम आरोग्य व स्वच्छ परिसरात राहणे हा गरिकांचा कलम २१ नुसार संविधानिक हक्क व मूलभूत अधिकार आहे. हे माहित असतांना सुद्धा प्रशासकीय यंत्रणा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळत आहे.
या न्यायप्रविष्ठ प्रकरणात ४ एप्रिल पर्यंत किंवा पुढे परिसरातील नागरिकांना जीवघेणा आजार झाल्यास व जीव गेल्यास संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, ग्रामसचिव, गटविकास अधिकारी पंचायत, संवर्ग विकास अधिकारी प.स. वरोरा, सभापती पं.स. वरोरा तहसीलदार वरोरा, उपविभागिय अधिकारी, वरोरा, जिल्हाधिकारी चंद्रपूर, आमदार विधानसभा क्षेत्र, खासदार लोकसभा क्षेत्र, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येवून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Previous articleकोरपना येथे शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाेके यांची जयंती निमित्त रैलीचे आयोजन ! 
Next articleकोरोना व्हायरस च्या भितीने चंद्रपूर महाकालीची यात्रा रद्द !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here