आई वडील बाहेरगावी गेले असता स्वतःच्या घरीच गळफास लावून जिवन संपवलं, दृष्य पाहून आई वडिलांचा टाहो.
चंद्रपूर :-
आजच्या डिजिटल युगात छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत मोबाईलचं वेड लागलंय असून शाळेकरी मुलांना तर मोबाईल चं एवढं भयंकर वेड लागलंय की त्याच्याशिवाय ते जणू राहूच शकत नाही, दरम्यान यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पूर्णतः बट्याबोळ झाल्याने आई वडील धर्मसंकटात सापडले आहें, त्यामुळे ते मुलांना मोबाईल देतं नाही पण याचं टेन्शन घेऊन मुलं आत्महत्त्या करतात असाच एक दुर्देवी प्रकार समोर आला असून चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर येथील 15 वर्षीय मुलाने वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून बाहेरगावी गेलेल्या आईवडिलांच्या पश्चात स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी समोर आली आहें, या घटनेने रमाबाई नगर वार्डात शोककळा पसरली आहें.
आत्महत्त्या केलेल्या मुलाचे नाव समवेल धर्मेद्र मेश्राम वय 15 वर्ष असून तो शाळेत शिकत होता, दरम्यान त्याच्या शिक्षकाने वडिलांना शाळेत बोलावून तुमचा मुलगा अभ्यास करत नाही असे म्हणून मुलाकडे लक्ष द्या असे समजावून सांगितले, वडिलांने मुलाला समज दिली की तू मोबाईल जास्त वापरू नको, त्यामुळे तुझं शिक्षण वाया जातं आहें, दरम्यान काल सकाळी नातेवाईक यांच्या कार्यक्रमासाठी आई वडील जायला निघाले असता आमच्यासोबत तू पण चल असे म्हणून मुलाला सांगितले पण मुलगा म्हणाला की मी घरीच राहतो फक्त मला टाईमपास करण्यासाठी मोबाईल द्या पण अगोदरचं शिक्षकांने वडिलांना तंबी दिल्याने वडिलांनी मुलाला मोबाईल दिला नाही व तू अभ्यास करं आणि टीव्ही बघ असे म्हणून ते बाहेरगावी निघून गेले, काल सायंकाळी ते परत आले तर घरी मुलगा गळफास घेऊन दिसला आणि ते दृष्य पाहताच आई वडिलांनी एकच टाहो फोडला, मोबाईल चं वेड लहान मुलांचं जिवन कसं उध्वस्त करत याचं हे दुर्दैवी उदाहरणं समोर आहें.