आर्वीच्या आमदार वानखेडे यांनी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं तर मग चंद्रपूर च्या आमदार किशोर जोरगेवार यांना मोरे ला हटवणं का जमलं नाही?
RTO चा पंचनामा भाग:- 15
“हे राज्य सरकार नपुंसक आहे, म्हणून हे सगळं होतंय”, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहें, अशातच आता आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात चंद्रपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे किरण मोरे यांचे प्रताप पुराव्यानिशी सांगितले व किरण मोरे यांना चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून असलेला कार्यभार काढून टाका अशी मागणी केली, पण भ्रष्टाचाराचे सर्वोच्य शिखर गाठलेले किरण मोरे यांनी आपले प्रताप लपविण्यासाठी प्रताप सरनाईक या परिवहन मंत्र्यांना दक्षिणा दिली असावी का? हा मोठा चिंतेचा विषय असून सत्ताधारी आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेली मागणी जर मंत्री मानत नसेल तर हे राज्य कारभार चालविणारे सत्ताधारी सर्वोच्य न्यायालयाच्या टिप्पणी नुसार नपुसंक झाले की काय? असा प्रश्न निर्माण होतं आहें. पण मग आमदार किशोर जोरगेवार यांच्या शब्दाला किंमत नसेल व ते सत्तेत असून सुद्धा सत्ताधारी त्यांची मागणी मनावर घेत नसेल तर हा प्रश्न सुद्धा त्या अर्थाने फार गंभीर स्वरूपाचा आहें, कारण RTO कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचाराचा पहिल्यांदा एक सर्वसमावेशक आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न जोरगेवार यांनी सभागृहात मांडून जनतेची मने जिंकली होती, पण किरण मोरे आणि आंनद मेश्राम सारख्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराने माखलेले RTO कार्यालय स्वच्छ व भ्रष्टाचामुक्त होण्याची जनतेची आशा आता मावळली असल्याचे संकेत मिळतं आहें, कारण आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी हवेतच विरली की काय? हा प्रश्न उपस्थित होतं आहें.
मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभारावर चांगलेच संतापले होते, यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारताना त्यांनी चंद्रपूर येथील प्रभारी आरटीओ किरण मोरे यांना बदलणार आहात का, असा थेट प्रश्न उपस्थित करत आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, “आरटीओ विभागात रॅकेट सक्रिय रित्या कार्यरत आहे. मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहने कार्यालयात जाऊन कोणत्याही प्रकारची तपासणी न करता त्यांना परवाने दिले जात आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
चंद्रपूर येथे आरटीओची जागा रिक्त असतानाही प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या भरवशावर आरटीओ कार्यालय चालवले जात आहे. परराज्यातील वाहनचालक येथे येताना त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. मागील काही घटनांमधून आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभार उघड झाला असतानाही अधिकाऱ्यांची उचलबांगडी होत नाही, मृतक व्यक्तीच्या नावाने परवाना देण्याचा प्रताप या विभागाने केला. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येथे तात्काळ नियमित आरटीओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन दिले होते पण आज महिना लोटून गेला पण RTO चा कार्यभार किरण मोरे कडून काढला नाही ही आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी नामुस्की ओढवून घेणारी बाब ठरत आहें.
आर्वीच्या आमदाराला जे जमलं ते चंद्रपूर च्या आमदाराला का नाही?
नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक आमदारांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करून मागण्या केल्या की त्यावर त्वरित उपाययोजना व्हाव्या आणि संबंधितावर कारवाई करण्यात यावी, दरम्यान चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून चार वर्षांपासून एकाच ठिकाणी भ्रष्ट अधिकारी म्हणून शिक्कामोर्तब असलेले किरण मोरे यांची उचलबांगडी करावी अशी मागणी केली होती, परंतु आत्तापर्यंत परिवहन मंत्र्यांकडून किरण मोरे यांच्यावर कुठंलीच कार्यवाही झाली नाही, मात्र आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी शेतकऱ्याचा प्रश्न अतिशय तळमळीने मांडला आणि
खरांगणा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली परिणामी खरांगणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांना निलंबित केले आहें. आश्चर्यांची बाब म्हणजे RTO किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या भ्रष्ट प्रतापाची मालिका सुरु असतांना व त्यांच्यावर संपूर्ण जनता चिडलेली असतांना खरं तर किरण मोरे ची उचबांगडी करायला हवी होती नव्हे त्यांना तर निलंबित करायला हवे होते, पण माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नसून आमदार किशोर जोरगेवार यांच्या शब्दाला किंमत उरली नाही का? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरत आहें.