मात्र काही सुपारीबाज पत्रकारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ठरवले दोषी, आता त्या पत्रकारांची अंतर्गत स्टोरी येणार समोर.
चंद्रपूर:-
सावली पोलीस स्टेशन येथे मनसे पदाधिकाऱ्यांवर हायवा ट्रक अडविल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले, पण ट्रक ड्राइव्हरवर दबाव टाकून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याने ते खारीज करण्यात यावे व ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस महानिरीक्षक भुजबळ आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्याकडे केली असता पोलीस अधीक्षकांनी चौकशी चे आदेश दिले आहें, शिवाय ज्या ड्राइव्हरला पोलिसांनी मारझोड करून स्वतः तक्रार तयार केल्यानंतर त्यावर ड्राइव्हर ची सही करायला लावली त्या ड्राइव्हरने मला पोलिसांनी मारहान करून जबरदस्ती सही घेतली असल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत केला आहें, त्यामुळे पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर आहें, मात्र काही वर्तमानपत्राचे सुपारीबाज पत्रकार ज्यांना केवळ कुठून पैसे मिळतात तो धागा पकडून बातम्या लिहिण्याचा मोह असतो त्या पत्रकारांनी खोटी बातमी देऊन मनसे च्या पदाधिकाऱ्यांना दोषी पकडले त्या पत्रकारांची आता अंतर्गत स्टोरी समोर येत आहें, पत्रकारितेतून जनतेला न्याय मिळवून देण्याचे सोडून हुजरेगिरी आणि मुजरेगिरी सारखी पोपट पत्रकारिता करणाऱ्या त्या पत्रकाराने कुणासोबत संपर्क केला त्याला कोण माहिती दिली याचा लवकरच भंडाफोड होणार असल्याची माहिती मिळाली आहें.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची सावली तालुक्यातील हिरापूर टोल नाक्यावर शाखा उदघाटन करण्यासाठी मनसे पदाधिकारी अमन अंधेवार, राजू कुकडे, महेश वासलवार व सुनील गुढे दिनांक 7/4/2025 ला सायंकाळी 5.30 वाजता गेले होते व त्यांनंतर सायंकाळी 6.30 वाजता परत निघाले दरम्यान काही दूर गेल्यानंतर खेडी फाटा जवळ एक हायवा ट्रक आडवा तिडवा जातं असतांना वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी समोर अपघात होऊ नये यासाठी तो ट्रक थांबवला, ट्रक मधून ड्राइव्हर बाहेर आल्यानंतर ड्राइव्हार दारू पिऊन असल्याचे लक्षात येताच त्यांनी तुझ्या गाडीत काय आहें हे विचारले असता त्याने रेती भरून आहे हे सांगितले, तेंव्हा तुझ्याकडे टीपी आहें का? हे विचारले असता हो आहें पण टीपी ऑनलाईन आहें असे तो म्हणाला म्हणून महेश वासलवार यांनी ही अवैध असू शकते त्यामुळे त्यामुळे प्रथम RTO निरीक्षक पायघन यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला सावली पोलीस स्टेशनंचे पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांना फोन करून आम्ही दारू पिऊन हायवा ट्रक चालविणारा ट्रक पकडला असे सांगितले असता त्यांनी मी लवकर पोलीस गाडी पाठवतो असे म्हटले, मात्र पोलिसांची गाडी जवळपास पाऊण तास उशिरा आली त्या दरम्यान एक ऑटो उभ्या असलेल्या ट्रकला धडकला आणि तो पलटी झाला, ऑटो ड्राइव्हार सुद्धा दारू पिऊन होता त्यामुळे तो अपघात झाला,
पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी सर्व पाहणी केली आणि ट्रक ड्राइव्हर ला ट्रक सावली पोलीस स्टेशनं येथे लावायला लावला आणि मनसे पदाधिकारी यांना पीएसआय मुसळे यांनी सांगितले की आम्ही ट्रक ड्राइव्हर वर ड्रॅंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल करतो, मात्र ऑटो वाल्यावर ड्रॅंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल करणार नाही कारण बिचाऱ्याचा इन्शुरन्स क्लेम होणार नाही मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानून त्यांना आपण जाऊ शकता असे म्हटले त्यामुळे मनसे पदाधिकारी चंद्रपूर ला पोहचल्या नंतर एक तासांनी सावली पोलीस स्टेशन येथून फोन आला की आपण सर्व मनसे पदाधिकारी बयान देण्यासाठी या परंतु महेश वासलवार यांनी आम्ही उद्या येतों असे म्हणून दुसऱ्या दिवशी गेले असता त्यांच्यावर रात्रीतून गुन्हा दाखल झाल्याचे बोलल्या गेले, त्यामुळे संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट मनसेच्या मुंबई येथील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला व मनसे पदाधिकाऱ्यावर लावलेल्या खोटे गुन्ह्यचा तपास करून दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी केली व दुसऱ्या दिवशी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असता त्यांनी चौकशी चे आदेश दिले, त्यामुळे ज्या अर्थी फिर्यादी ड्राइवर यांनी पत्रकार परिषदेत मनसे पदाधिकाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा खुलासा केला असल्याने मनसे पदाधिकारी निर्दोष असल्याची स्पष्ट होतं आहें.
त्या सुपारीबाज पत्रकाराचे जावई शोध येणार अंगलट?
देशात जर खऱ्या अर्थाने सामाजिक आरोग्य गढूळ झालं असेल तर त्यामागे आपली पत्रकारिता कारणीभूत आहें, कारण जनतेचे जिवंत आणि ज्वलंत प्रश्न सोडून नको ते उपदव्याप प्रसारमाध्यम करताहेत, असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असून एका पत्रकाराने तर अकलेचे तारे तोडून नवे जावई शोध लावले, जिथे राजू कुकडे मुख्य आरोपी नाही तिथे त्यांना मुख्य आरोपी केले आणि आपली फालतू लेखणी पाझळली, शिवाय खंडणी चे गुन्हे नसताना त्या गुन्ह्याचा उल्लेख केला आणि नको ते संदर्भ जोडले, दरम्यान आता त्यांनी जवाई शोध कसा लावला याची अंतर्गत स्टोरी समोर आली असून आता भूमिपुत्राची हाक च्या पंचनाम्याची मालिका त्यांची सुरु करायची का यावर संपादक व इतर प्रतिनिधी विचार करताहेत, दरम्यान त्यांच्या त्या जावई शोधाची माहिती त्यांच्या संपादकांना देऊन त्यांची उचलबांगडी करण्याचा मनसूबा पण विचारधीन आहें. कारण अशा नतभ्रष्ट पत्रकारामुळे पत्रकारिता बदनाम झाली असल्याने अशांचे असली चेहरे जनतेसमोर यायलाच हवे असा सूर सर्वांचा असल्याने त्या सुपारीबाज पत्रकाराचे जावई शोध अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहें.