गुप्त माहितीनुसार नोकरी च्या बदल्यात शरीरसुख भोगणाऱ्या त्या संचालकाचा यु टर्न, घरच्याना माहीत होऊ नये म्हणून मुलगी चूप?
चंद्रपूर :-
नुकत्याच तब्बल 360 पदाच्या सिडीसीसी बैंकेतील नोकर भरतीत 25 ते 40 लाख रुपये देणाऱ्या उमेदवार यांना परीक्षेत घोटाळा करून पास करणारे व त्यांना नियुक्ती पत्र देऊन कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे संचालक मंडळ एआयटी चौकशी च्या व न्यायालयाच्या जाळ्यात अडकून स्वतःच्या बरबादीचा इतिहास लिहीत असतांना आता त्यापैकी एक संचालक मोठा शातीर निघाला असून त्याने चक्क एका मुलीला सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत तुझा नंबर लावतो हे आश्वासन देऊन तिच्यावर अत्त्याचार केला, पण इकडे पैशाच्या मोहात लालबुंद झालेले संचालक सबसे बडा रुपय्या ह्या आपल्या चिरपरिचित स्वभावाचे दर्शन घडवत यु टर्न घेतला व त्या मुलीला नोकरी न देता वाऱ्यावर सोडले आहें, दरम्यान त्या मुलीने ही बाब आपल्या मैत्रिणीला सांगितली व मैत्रिणीने आपल्या मित्राला सांगितली, पण मी पोलिसांकडे तक्रार दिल्यास माझे घरचे काय म्हणतील या चिंतेने पोलिसांत तक्रार दिली नाही, मात्र ही बाब अतिशय गंभीर असून सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत खळबळ उडवून देणारी आहें.
सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत मोठा घोटाळा झाला त्यामुळे या भरतीची एसआयटी चौकशी करावी व दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व आरक्षण बचाव संघर्ष समिती मधील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, या दरम्यान तब्बल 28 दिवस आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिडीसीसी बैंकेत झालेल्या घोटाळ्याचा पाढाच वाचला त्यामुळे ही नोकर भरती कोणत्याही क्षणी रद्द होऊन ज्यांना नियुक्ती पत्र दिले त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ येऊ शकते, मात्र नोकरी लावून देतो म्हणून एका मुलीच्या शरीरसुखाची हौस पूर्ण करणाऱ्या त्या संचालकाचे लवकरच पितळ उघडे पडणार अशी निकटवर्तीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहें, दरम्यान त्या संचालकाला उघडे पाडणारे पुरावे सुद्धा समोर येणार असल्याची माहिती आहें.