Home चंद्रपूर चिंताजनक:- पुणे वरून चंद्रपूर ला निघालेल्या ट्रॅव्हल्सला दारव्हा मार्गावर अपघात.

चिंताजनक:- पुणे वरून चंद्रपूर ला निघालेल्या ट्रॅव्हल्सला दारव्हा मार्गावर अपघात.

चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली दरीत पलटली. झाडाला ट्रॅव्हल्स अडल्याने मोठी घटना टळली.

चंद्रपूर:

पुणे-चंद्रपूर प्रवाशी वाहतूक दररोज होतं असतांना आज अचानक पुणे वरून प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला दारव्हा मार्गावरील इचोरी घाटात शनिवारी सकाळी ९ वाजता अपघात झाला. चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली दरीत पलटली. सुदैवाने झाड आडवे असल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच लाडखेड व यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटलेल्या ट्रॅव्हल्सला सरळ करून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान काही प्रवाशी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहें

ट्रॅव्हल्स चा अपघात झाल्याने प्रवासी साहित्याबद्दल चिंतित होते. कारण अपघातामुळे प्रवाशांच्या बॅगा व सोबतचे साहित्य अस्ताव्यस्त झाले होते, काहींचे मोबाईलही गहाळ झाले असून त्याचा शोध सुरू होता. आता ते प्रवाशी कोण गंभीर जखमी आहेत याबद्दल अधिकृत माहिती पोलिसांकडून जाहीर होणार असल्याची माहिती आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here