भ्रष्टाचार, चालबाजी आणि घोटाळ्याचं मोक्याचं ठिकाण असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेतील निवडणूकीच्या रिंगणातील त्या संचालकांचे वाभाडे निघणार?
न्यूज नेटवर्क चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीदरम्यान नामांकन अर्जासोबत जोडलेल्या अंकेक्षण अहवालासंदर्भातील वाद उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरु असताना त्याची सुनावणी सोमवारी दि. २३ जून ला पूर्ण झाली मात्र न्या. पानसरे यांच्या खंडपीठाने तो निर्णय राखून ठेवला होता व आज दिनांक २७जूनला निकाल जाहीर होणार आहें, दरम्यान संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष या निकालाकडे लागले असून आज खऱ्या अर्थाने ते कोण उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहणार हे स्प्ष्ट होणार आहें. मात्र भ्रष्टाचार, चालबाजी आणि घोटाळ्याचं मोक्याचं ठिकाण असलेल्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेतील त्या निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या त्या विद्यमान संचालकांचे वाभाडे निघणार असल्याची माहिती आहें.
सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत कोट्यावधी चा भ्रष्टाचार करून सत्ताधारी संचालकांनी जे पाप केलं त्या पापाचा घडा आता लवकरच काही दिवसानंतर होणाऱ्या एसआयटी चौकशी च्या माध्यमातून फुटणार आहें, मात्र निवडणूकी दरम्यान जे प्रसारमाध्यमातून फटाके फुटणार आहें, त्यात ते सर्व संचालक रडारवर असणार आहें, ज्यांनी नोकर भरतीच्या मिळालेल्या संधीचा उपयोग करून कोट्यावधी ची माया जमवली, कुणाची शेती गहाण केली तर कुणाच्या शेतीची विक्री करून घेतली आणि कुणी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली मुलीचे लैंगिक शोषण केलं आहें, असं असतांना तो मी नव्हेच या भूमिकेत वावरणाऱ्या त्या संचालकांचे मात्र आता वाभाडे निघणार आहें.
चंद्रपूर जिल्हा बँकेसाठी १० जुलैला मतदान तर ११ जुलै २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. २७ जून २०२५ पर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. नामांकन अर्जासोबत काही उमेदवारांनी वित्तीय वर्ष २०२४-२५ या वर्षातील अ आणि ब वर्गातील अंकेक्षण अहवाल जोडले होते. या अहवालांवर आक्षेप घेत काही याचिकाकर्त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. दरम्यान, आणखी एका प्रकरणात पोंभुर्णा तालुक्यातील उमाराणी मरपल्लीवार, गोंडपिपरीचे अमर बोडलावार, तसेच कोरपण्याचे तुकाराम पवार यांनी नामांकन अर्जासोबत वैनगंगा खोरे वाहतूक संस्थेचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेत न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरही पुढील तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक गजानन पाथोडे यांनी नागभीड तालुक्यातील अ गटातून माघार घेतली. त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश तर्वेकर यांचा अविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. पाथोडे आता ओबीसी गटातून रिंगणात आहेत. तर्वेकर हे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यापूर्वी पाच संचालक अविरोध निवडून आले.