Home महाराष्ट्र राज-उद्धव ठाकरे यांच्या 5 जुलै च्या मोर्च्याच्या धडकीने हिंदी भाषा सक्तीचा जी...

राज-उद्धव ठाकरे यांच्या 5 जुलै च्या मोर्च्याच्या धडकीने हिंदी भाषा सक्तीचा जी आर पलटी?

महाराष्ट्रातला पहिला भव्य दिव्य मोर्चा होणार या भीतीने फडणवीस सरकारचा निर्णय, फडणवीसांना पडावं लागलं तोंडाघशी?

न्यूज नेटवर्क:-

राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस पेटून उठला आणि संपूर्ण मराठी माणूस आता एकत्र यायला तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले, सगळ्यां साहित्यिक लेखक पत्रकार व मराठी कलावंत यांनी मराठी भाषेची घेतलेली बाजू आणि हिंदी भाषेचा दाखवलेला विरोध यामुळे आपण जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा 5 जुलै ला मोर्चा होऊ दिला तर सरकारचा सर्वत्र विरोध होऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपली नाचक्की होईल या भीतीने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने आज पत्रकार परिषद घेऊन त्रिभाषा सूत्राबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. यानंतर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त करत सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी भूमिका सोशल मीडिया पोस्टद्वारे मांडली.

दरम्यान राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय सरकारने एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाकरे बंधूचा मोर्चा झाला असता तर..

राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मराठी भाषिकांना केलेले आवाहन व त्यात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मोर्चात येण्याचे दिलेले शब्द यामुळे हा मोर्चा न भूतो ना भविष्यती होईल असे वाटत होते, दरम्यान हा हिंदी भाषेचा निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांनी म्हटले की महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे”, असेही राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here