Home महाराष्ट्र धक्कादायक:- स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्त्या?

धक्कादायक:- स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्त्या?

भ्रष्ट शासन प्रशासन व्यवस्था यासाठी दोषी असल्याने सरकार कडून शेतकऱ्यांची ही हत्त्याचं असल्याच्या सर्वत्र प्रतिक्रिया..

न्यूज वेब:-

सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार जनतेचे मत चोरून बनले असल्याचे निवडणूकीतील बोगस मतदारावरून स्पष्ट झाले असताना व सगळे भ्रष्ट नेते या सरकार मध्ये मंत्री बनले असतांना आता या सरकारने शेतकऱ्यांचे बळी सुद्धा घेण्याचा पर्यन्त सुद्धा चालवलेला आहे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायोचित मागण्या मान्य करायच्या नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करायला लावायचं आणि त्यांना आत्महत्त्या करण्यास बाध्य करायचं हा सरकारचा डाव असल्याची विदारक स्थिती स्थिती असून जळगाव जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका विनोद पवार नावाच्या शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सरकार विरोधात शेतकऱ्यांचा मोठा संताप व्यक्त होतं आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या हक्क अधिकारासाठी जर आंदोलन करावे लागत असेल तर मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आलेल्या लोकशाही पद्धतीचे सरकार नेमके कुणासाठी काम करते? हा प्रश्न उपस्थित होतं आहे, खरं तर आता आपले हक्क अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून सुटत नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागत असेल तर त्या शेतकऱ्यांच्या विधानसभा आणि लोकसभा मतदार संघाच्या आमदार खासदार यांना खरं तर फासावर चढवायला हवं, कारण शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ याच नादान लोकप्रतिनिधीमुळे आली आली आहे असा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.

विनोद पवार या शेतकऱ्यांचे बलिदान की हत्त्या?

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा करतो असे म्हणणारे फडणवीस सरकार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या शेती शासनाच्या प्रकल्पाला गेल्या पण त्याचा मोबदला मिळतं नाही, अशातच स्वातंत्र्याच्या दिवशी 15 ऑगस्ट 2025 ला सकाळी जळगाव जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते, जिगाव प्रकल्पांमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या शेती धरणात गेलेल्या असून अद्याप पर्यंत अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला या अगोदर मोबदला न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता. दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळावा यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आढळ गावाजवळ पूर्णा नदी पात्राजवळ जलसमाधी आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलनाला सरकार तर्फे व स्थानिक जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्याने गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार याने पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्त्या केली यावेळी आंदोलक आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. आंदोलक विनोद पवार काही वेळातच नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले. बराच वेळ ते पाण्याच्या बाहेर न आल्याने तातडीने महसूल विभागाच्या एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी जळगाव जामोद पोलीस आणि एनडीआरएफ पथक नदीपात्रात सदर बेपत्ता आंदोलकाचा शोध घेत अजूनही मृतदेह मिळाला नाही, खरं तर प्रशासनाने ज्याअर्थी जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नदी पात्राजवळ आंदोलन करू देणे हाच मुळात प्रश्न गंभीर असून विनोद पवार यांना प्रसासनाने आत्महत्त्या करण्यास बाध्य केले आहे आणि त्यामुळे विनोद पवार यांची आत्महत्त्या नसून त्यांची सरकार व स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून हत्त्या करण्यात आल्याचे स्पष्ट त्यामुळे दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिडीत आंदोलक शेतकरी करीत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here