Home वरोरा क्राईम :- टेमुर्डा परिसरात वाढतेय गुन्हेगारी, एकावर कुऱ्हाडीने वार प्रकृती गंभीर

क्राईम :- टेमुर्डा परिसरात वाढतेय गुन्हेगारी, एकावर कुऱ्हाडीने वार प्रकृती गंभीर

टेमुर्डा एकता नगर मधील घटना, शुल्लक वादातुन वार, आरोपी गजाआड. पोलिसांचा तपास सुरू

वरोरा टेमुर्डा प्रतिनिधी (धनराज मा बाटबरवे) मो.7498923172

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परिसरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र असतांना येथील एकता नगर मध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. टेमुर्डा परिसरातील एकता नगर मध्ये शेजारी राहणाऱ्या एकाला शुल्लक वादातुन कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची बाब समोर आली आहे, दरम्यान पत्नी पतीचा जीव वाचविण्यासाठी पुढे आली असता तीला पण आरोपीने मारहान करून जखमी केले या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली असून आरोपीला पोलिसांनी गजाआड करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

अमोल चेंबुर दाऊदसरे असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या शाहरुख नावाच्या व्यक्तीने अगदी शिल्लक करणासाठी झालेल्या भांडणातून क्रोधात येऊन कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले, दरम्यान जखमीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर ला ऑपरेशन करिता नेणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here