गरिबीच्या स्थितीतून आपल्या संसाराचा गाडा हाकत उज्वल भविष्याचे स्वप्न रंगत असतांना नियतीने खेळ खेळला….
वरोरा चारगाव(धनराज बाटबरवे):-
वरोरा तालुक्यातील चारगाव बु येथील कलावती संतोष बावणे ह्या घरी गरिबीची स्थिती असताना आपल्या संसाराचा गाडा हाकून भविष्यात आपली मुलं काही बनतील म्हणून काबाडकष्ट करायची व मुलांच्या भविष्याचा विचार करायची पण गरिबीच्या स्थितीतून आपल्या संसाराचा गाडा हाकताना उज्वल भविष्याचे स्वप्न रंगत असतांना नियतीने खेळ खेळला आणि साप डसून वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षातच तीला देवआज्ञा झाल्याने अख्ख गाव हळहळलं.
कलावती संतोष बावणे या आपल्या घरात काम करत असताना त्यांना सर्प दंश झाला हे लक्षात येताच त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आलं नंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं परंतु नियतीने खेळ खेळला आणि कलावती यांनी श्वास सोडला आणि देवाज्ञा झाली त्यांच्या मागे त्यांचे पती संतोष बावणे 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी असा छोटासा परिवार आहे, त्यांच्या आकास्मिक जाण्याने त्यांच्या परिवारावर मोठं संकट कोसळलं आहे, मनसचे विभाग अध्यक्ष रंगनाथ पवार यांच्या पत्नीची (संगीता पवार) कलावती ही बहीण आहे, त्या पवार कुटुंबावर सुद्धा दुःख कोसळलं आहे, अशा संकटकाळी परमेश्वर बावणे कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशीच प्रार्थना गावकरी करत आहे.