मनसे जनहीत विभाग शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी मनपा आयुक्ताना दिलेल्या निवेदनातून कंत्राटदारावर कारवाई करण्याची केली मागणी.
चंद्रपूर:-
चंद्रपूर महानगरापालिका आता भ्रष्टाचाराच माहेरघर बनलं असून येथील कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून शहराच्या जनतेसोबत जणू खेळत असल्याचे दिसतं आहे, शहरातील हनुमान खिडकी जवळील झरपट नदीच्या पुलावरती चार फूट खोल खाली भेगा पडून तो पूल पडण्याच्या स्थितीत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भीतीदायक पूल बांधणाऱ्या त्या कंत्राटदारावर कारवाई करा आणि तो पूल दुरुस्त करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण जनहीत कक्षातर्फे जनतेच्या हितासाठी मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पियुष धुपे यांनी मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
चंद्रपूरातील चार ऐतिहासिक गेट व चार मुख्य खिडकी पैकी एक असलेल्या हनुमान खिडकीच्या मार्गानी भिवापूर वॉर्ड, दादमहाल वॉर्ड बाबुपेठ वॉर्ड व शहरातील अनेक जनता ये-जा करतात त्या हनुमान खिडकी जवळ असलेल्या झरपट नदी पुलाचे बंधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने व हा पूल दरवर्षी पावसामुळे येणाऱ्या पुराचा पाण्यात बुडून जातो. पण यंदाचा पावसाचा पाण्यामुळे पूला वरती चार ते पाच फूट खोल भेगा पडल्या व एका बाजूने संपूर्णपणे खालचा बाजूने दबला गेला आहे.
या पुलावरून लोकांचे पायदळ व दोन चाकी, तीन चाकी वाहने येणे जाणे चालूच आहे. यामुळे तिथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या पुलाचे तात्काळ बांधकाम करावे व त्या बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी अन्यथा मनसे तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे जनहीत कक्ष शहर अध्यक्ष पियुष धुपे यांचेसह जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल इत्यादिची उपस्थिती होती.