कृष्णनगर येथील जगनाथ बाबा मठा जवळील श्री. किशोर तांबेकर यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी देवीची स्थापना, भक्तिमय वातावरणात धार्मिक उत्सव
चंद्रपूर :- कृष्णनगर येथील जगनाथ बाबा मठा जवळील श्री. किशोर सुघोबाजी तांबेकर यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी देवीची भव्य स्थापना मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात पार पडली. या पावन प्रसंगी परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.
News report :- अतुल दिघाडे
महालक्ष्मी पूजन, घटस्थापना आणि विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले. उपस्थित भाविकांनी देवीचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतला.
या मंगल प्रसंगी शुभेच्छुक म्हणून उपस्थित होते:
सौ. माधुनाई किशोर तांबेकर, श्रुती किशोर तांबेकर, भिष्मापू किशोर तांबेकर, सौ. सुरणा झाडे, श्री. प्रशात झाडे, श्री. अविनाश मडावी तसेच इतर परिवारजन व मित्रपरिवार.
या पूजेनिमित्त अनेक भक्तगणांनी दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून भक्तिभावाने वातावरण भारले गेले होते.
—