Home Breaking News अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘मंडप’युद्ध! मुनगंटीवार VS जोरगेवार गट आमने-सामने

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘मंडप’युद्ध! मुनगंटीवार VS जोरगेवार गट आमने-सामने

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘मंडप’युद्ध! मुनगंटीवार VS जोरगेवार गट आमने-सामने

📍 चंद्रपूर :-  शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणुकांचे जल्लोषात आयोजन सुरू असताना, चंद्रपूरच्या राजकारणात मात्र एक वेगळाच ड्रामा घडला! भाजपचे दोन दिग्गज नेते – सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार – यांच्या समर्थकांमध्ये “मंडप कुणाचा?” या मुद्द्यावरून थेट रस्त्यावर संघर्ष उफाळून आला!

News reporter :- अतुल दिघाडे

🎪 मंडपाच्या जागेवरून पेटला वाद

लोकमान्य टिळक शाळेजवळील मुख्य रस्त्यावर गणेश मिरवणुकीसाठी भाजपकडून स्वागत मंडप उभारण्यात येणार होता. मात्र, हीच जागा भाजपमध्ये अंतर्गत वादाचे केंद्रबिंदू ठरली.

एका बाजूला, भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या संमतीने तात्पुरता मंडप उभारला होता. तर दुसऱ्या बाजूला, जोरगेवार समर्थक आणि भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष सुभाष कासनगोहूवार यांनी या जागेवर आक्षेप घेतला आणि या ठिकाणीच अधिकृत मंडप उभारण्याचा हट्ट धरला.

🔥 पक्षाचा अंतर्गत वाद थेट रस्त्यावर!

हा संघर्ष महापालिकेतील बंद दारांआड न राहता थेट जनतेसमोर आला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. जोरदार घोषणाबाजी, शाब्दिक चकमकी आणि धक्काबुक्कीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यामुळे पोलीस यंत्रणेला हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत करावे लागले.

🏛️ ‘गणरायाच्या’ स्वागताऐवजी ‘सत्तेच्या’ संघर्षाकडे लक्ष!

ही घटना केवळ अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली नाही, तर चंद्रपूर भाजपमधील सतत सुरू असलेल्या गटबाजीचे जिवंत उदाहरण आहे. लोकांमध्ये मात्र प्रश्न निर्माण होतोय – “हे स्वागत मंडप आहे की शक्तिप्रदर्शन?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here