भद्रावती शहरातील मुस्लिम बांधव उतरले रस्त्यावर, भद्रावती पो. स्टे चे पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन.
भद्रावती (प्रतिनिधी):-
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम बांधबानी पण आपले योगदान दिले असताना मोदी आणि योगी सरकार मुस्लिम समुदायाचा द्वेष करतात व धार्मिक तेढ निर्माण करतात, या देशात अनेक जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंद्याने राहतात पण राजकारणासाठी धार्मिक भावना भडकवल्या जाते अशीच एक घटना कानपुर उत्तरप्रदेश मध्ये घडली असून आय लव्ह महमम्द चे बोर्ड लावले गेले त्यावरून पोलिसांनी मुस्लिम बांधवावर गुन्हे दाखल केले त्यावरून मुस्लिम बांधव आक्रमक झाले असून भारतात लोकशाहीने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, जो आपल्या धर्माप्रती प्रेम दाखवत असेल तर व आपल्या धर्माच पालन करतो असेल तर त्याला स्वातंत्र्य आहे, पण उत्तर प्रदेश पोलीसांनी ज्या पद्धतीची कारवाई केली ती आमच्या मुस्लिम बांधवाच्या धार्मिक प्रेमाविरोधात केली ती कारवाई असंविधानिक आहे, त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन भद्रावती येथील शेकडो मुस्लिम बांधव यांनी निषेध रैली काढून आय लव्ह मुहम्मद चे पोस्टर दाखवत भद्रावती पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आपला आक्रोश व्यक्त केला..
खरं तर उत्तर प्रदेश च्या कानपुर मध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मुस्लीम समुदाय आणि पैगम्बर ए-इस्लाम वर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे, लोकशाही देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना व आपले धार्मिक उत्सव साजरे करण्याची व त्याप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याचा त्यांना मौलिक अधिकार असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी कुणाच्या धार्मिक प्रेमावर बंदी आणणे हे लोकशाहीत धोकादायक आहे, कारण हा देश जसा हिंदूचा आहे तसा तो मुस्लिम बौद्ध शीख इसाई या समुदायचा सुद्धा आहे आणि प्रत्येक धर्मातील लोकं आपापले धार्मिक प्रेम व्यक्त करतात तो त्याचा अधिकार असल्यामुळे कानपुर मध्ये ज्या पद्धतीने आय लव्ह मुहम्मद चे पोस्टर लावल्याने जी पोलिसांनी कारवाई केली त्याचा निषेध करून आम्हांला आमचे धार्मिक प्रेम व्यक्त करण्याचे अधिकार हिरावून घेऊ नका ही मागणी घेऊन आय लव्ह मुहम्मद चे बोर्ड लावून भद्रावती मुस्लिम बांधवानी भद्रावती पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष हसन शेख यांचेसह युवा मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.