भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या दणक्याने सुनिल सोनटक्के यांच्याकडील acf चा प्रभार काढला ?
कुरखेडा प्रतिनिधी :-
प्रभारी उपविभागीय वन अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या भ्रष्ट लीला याशिवाय त्यांच्या रासलीला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात सद्ध्या चर्चेचा विषय असून भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर सोनटक्के यांच्या भ्रष्टाचारा ची मालिका प्रकाशित होत आहे, मात्र भ्रष्टाचार आणि अय्याशी चा सरदार असलेल्या सोनटक्के यांनी स्वतःचे पाप लोकांसमोर आणणाऱ्या न्यूज पोर्टल च्या संपादकांची बदनामी करण्यासाठी चक्क भाडोत्री टोळी पकडली आणि त्या टोळक्याना पैसे देऊन अनापषणाप लिहिण्याची सुपारी दिली. पण सोनटक्के यांच्या भ्रष्ट लीला वरिष्ठ वन अधिकारी यांच्याकडे जाऊन शेवटी सोनटक्के यांच्या कडे असणारा acf चा चार्ज काढण्यात आला असल्याची चर्चा असून लवकरच सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा होण्याचे संकेत मिळत आहे,
एकीकडे सोनटक्के यांची विभागीय चौकशी झाली असली तरी त्या चौकशी समिती ला मैनेज केल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे अगोदरच सेक्शन 8 नुसार सोनटक्के यांना कारणे दाखवा नोटिस दिला असतांना त्याचे उत्तर मात्र सोनटक्के यांनी दाखल केले नाही. आणि आता उलट कार्यवाई होऊ नये म्हणून वनमंत्री यांच्या खाजगी सचिव असलेल्या पवारांच्या माध्यमातून चौकशी अधिकारी आणि वरिष्ठ वन अधिकारी यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याने वरिष्ठ वन अधिकारी हे सोनटक्के यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही असे चित्र दिसत आहे, पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सोनटक्के यांच्याकडून acf चा अतिरिक्त प्रभार काढून टाकल्याने आता सोनटक्के यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा जोरात दिसत आहे.