Home लक्षवेधी प्रेरणादायी :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना डोळ्यात अश्रू आणणारे...

प्रेरणादायी :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना डोळ्यात अश्रू आणणारे आव्हान !

सुनील ईरावर या कट्टर महाराष्ट्र सैनिकांच्या आत्महत्त्या प्रकरणी राजसाहेब हळहळले. सुनील च्या भावाला फोन करून व्यक्त केल्या शोक सवेंदना.

मुंबई :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून महाराष्ट्र सैनिकांसाठी ते एक परिवारातील मायबाप आहे. एखाद्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला किंव्हा त्यांच्या परीवरावर दुःख कोसळले तर ते नेहमी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करतात नव्हे स्वतः त्यांच्या परिवारातील सदस्यांना फोन करून सांत्वन करतात असाच एक दुःखद प्रसंग
त्यांच्या वाटेला आला, एक उमदा महाराष्ट्र सैनिक ज्याच्या रगारगात मनसे आणि राजसाहेब भिनले होते तो कट्टर महाराष्ट्र सैनिक सुनील ईरावर यांनी अकस्मात आत्महत्या केली, त्यामुळे राजसाहेब हळहळले आणि त्यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिकांना एक पत्र लिहून आव्हान केल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.

राजसाहेब यांनी पत्रात नमूद केलय की
संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.

सुनील ईरावर ह्या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की ‘साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा. ‘

अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.

मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा… त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत… ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे… असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.

सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या. वरील आशयाचे पत्र वाचून महाराष्ट्र सैनिकांचा उर भरून येतो असे शब्द राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे, हे पत्र वाचल्यावर राजसाहेब आपल्या महाराष्ट्र सैनिकावर किती प्रेम करतात हे लक्षात येते आणि म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम मराठी युवकांची आयकॉन म्हणून राजसाहेब ठाकरे यांचा उल्लेख होतो.

Previous articleकाव्यकुंज लवकरचं आरंभ हाेतेयं!सहजं सुचलं ग्रुपचा उपक्रम!मेघा धाेटे,मायाताई काेसरे,व जास्मिन शेख यांचा पुढाकार!
Next articleसनसनिखेज :- सोनटक्के यांना पवारांची साथ मिळाल्याने चौकशी अधिकारी आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांवर दबाव ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here