राजूरा (प्रतिनिधी)चंद्रपूर
जिल्ह्यातील राजूरा निवासी सहज सुचलं ग्रुपच्या संयोजिका अधिवक्ता मेघा धोटे, सहसंयाेजिका मायाताई काेसरे, जास्मिन शेख तदवतचं महाराष्ट्रभर सहज सुचलं ग्रुप ज्यांच्यामुळे उदयास येऊन यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे असे किरण घाटे यांच्या संकल्पनेतून एक सुंदर उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे तो उपक्रम म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रात एक महत्वाचे पाऊल म्हणून या ग्रुपलाच जोडून महिलांसाठी काव्यकुंज’ या नावाने एक नवे व्यासपिठ निर्माण हाेत आहे . काव्यरचना लिहिण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस (सहज सुचलचा) आहे याचे नियोजन लवकरच कळविण्यात येईल महिलांना लिहिते करून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे एवढेच नाही तर त्यांच्या कलागुणांना व पर्यायाने समाजाचा सामाजिक विकास घडून यावा ,उत्तम रचना लिहून समाज परिवर्तनाचे महान कार्य घडावे ,मराठी भाषा विकास व मराठी मातृभाषेचे सक्षमीकरण व्हावे, ह्या बहुउद्देशीय उपक्रमाचा सर्वांना लाभ व्हावा हा मुख्य हेतु व उद्देश्य आहे .
या उपक्रमात सहभाग घेऊन योग्य रचनेला सन्मानित करण्याचे कार्य सुध्दा या उपक्रमाअंतर्गत राहणार आहे नवाेदितां कवयित्रिसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार असून या अभिनव उपक्रमाबद्दल मायाताई काेसरे,मेघा धाेटे आणि किरण घाटे यांचे वतीने (या उपक्रमाची)अधिक्रूत घाेषणा येत्या १५आँगष्टला हाेत आहे .
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मायाताई कोसरे ,मेघा धोटे ,किरण घाटे यांचे सह जस्मिन शेख , भाग्यश्री हांडे , धनश्री घुगरे (पांडव ) रक्षा नगराळे , वर्षा शेंडे , कविता चापले स्मिता बांडगे अंजूर्मन शेख विजया भांगे, मंजूषा दरवरे,विजया तत्वादी रजनी रणदिवे ,लता निंदेकर सुवर्णा कुळमेथे, नयना झाडे ,मयुरी समर्थ ,रितू गायकवाड़ , वंदना आगरकाठे , स्मिता मेहेत्रे , काजल दुधे ,भावना खाेब्रागडे , प्रतिमा नंदेश्वर ,डाँ. शरयु पाझारे.डाँ.अंजली साळवे , डाँ .भारती येल्लेवार ,सुशीला पुरेड्डीवार , ज्याेती इंगळे , रजनी पाेयाम, अनिता आष्टनकर ,यामिनी नैताम, छबूताई वैरागडे, श्रूती उराणकर ,अल्का माेटघरे ,वंदना हातगांवकर ,मंजुषा दरवरे अल्का गंगशेट्टीवार , सरीका लाेणकर ,मंगला गाेंगले , पुनम मडावी ,पुनम रामटेके यांचे महत्वाचे योगदान राहणार आहे.
सल्लागार म्हणून ग्रुप मधील इतर चमुंचेही योगदान असणार आहे तेव्हा या काव्यकुंज ग्रूपवर आपल्या काव्यरचना सादर करण्यात याव्या उत्क्रूष्ठ रचनेला योग्य न्याय देण्याचा आयाेजकांचा आटोकाट प्रयत्न असेल यात तिळमात्र शंका नाही काव्यकुंज या उपक्रमात सहभागी हाेण्यांचे आवाहन मुख्य संयाेजिका मायाताई काेसरे यांनी केले असुन(९२८४४९९१२८) या क्रंमाक वर संदेशाव्दारे संपर्क साधावा !विशेष उल्लेखनिय बाब अशी की वर्धेची प्रतिक्षा मैदपवार(अवघ्या नवव्या वर्गात शिक्षण घेणारी कवयित्रि) ही काव्यकुंजची सर्व प्रथम सदस्या झाली आहे .