Home भद्रावती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या आदेशानुसार अवैध दारू...

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या आदेशानुसार अवैध दारू तस्करीवर गुन्हे शोध पथकाची बेधडक कारवाई दोन वेग-वेगड्या कारवाईत 12 लक्ष 48 हजारचा माल जप्त

उमेश कांबळे (ता प्र भद्रावती) सध्या जिल्यात सर्वत्र दारू माफियांच्या धुमाकूळ सुरु असतांना भद्रावती तालुक्यात सुद्धा अवैध दारू विक्रीला चांगलेच उत्थान आले आहे. दिनांक १६ ला पुर्ना सेल्स अँड सर्विस एम आय डी सी रोड भद्रावती या दुकानातुन २ लक्ष ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून सध्या चार आरोपी ताब्यात घेतले आहे सदर कारवाई गुन्हे शोध पथकाने बजावली आहे ,. त्यात सदर दुकानाची झडती घेतली असता ९ चुंगडीत संत्रा रॅकेट च्या ९० एम एल मापाच्या ३०० निपा अंदाजे किंमत २ लक्ष ७० हजार असून २१ हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण २ लक्ष ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात मुख्य आरोपी अर्जुनसिंग प्रेमसिंग जुनी, वय २४ रा वडनेर , अभिजीत पांडुरंग सुरशे वय ३५, रा राजूर कॉलरी , गजानन शंकर गोहणे वय ४२, रा भद्रावती आणि सुंदर रुपचंद वर्मा नवीन सुमठाना याना ताब्यात घेतले आहे लगेच दुसऱ्याच दिवशी दि १७ ला भद्रावती पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारावर नागपूर वरून चंद्रपूर कळे अवैध दारूसाठा घेऊन जात असलेली पांढऱ्या रंगाची वरणा गाडीतुन २ लाख ५७ हजार २०० रूपयाची दारूसाठा आणि ७ लक्ष किमतीची वरणा गाडी असा एकूण ९ लक्ष ५७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समोर पोलिसांची नाकाबंदी पाहून या अवैध दारू तस्कऱ्यानी पळ काढला. सदर कारवाई गुन्हे शोध पथकाने दिनांक १७ ला पहाटे ३ वा पेट्रोल पंप चौकात केली. अवैध दारूची तस्करी करीत असलेली वरणा गाडी क्र ,एम ,एच ०८ सी ८७०३ च्या चालकाने पळ काढण्यासाठी कोळसा खदान एमटा च्या दिशेने गाडी वळवली आणि त्यातच गाडीचा टायर फुटल्याने चालकाने पळ काढला. त्यात गाडीची झडती घेतली असता ९० ,एम एल मापाच्या २५०० देशी दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये, हायवॉर्ड बिअर ची कॅन किंमत ७२०० चा दारूसाठा जप्त करण्यात यश मिडाले सदरच्या दोन्ही कारवाई मध्ये अंदाजे १२ लक्ष ४८ हजार २०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. हि कारवाई नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील पवार यांच्या नेतृत्वात अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे , हेमराज प्रधान, निकेश ढेंगे, शंशाक बदामवार यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here