नायकांचा चंद्रपूर वणी गडचांदूर प्रवास अवैध धंद्यावर अंकुश लावणारा की अभय देणारा ?
पोलीस पंचनामा भाग – ५
गडचांदूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल भारती यांनी अवैध धंदेवाईक यांच्यासोबत आपली अर्थपूर्ण मैत्री करून पोलीस विभागात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, ज्या पोलीस स्टेशन मधे “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” हे पोलीस ब्रीद तिथे येणाऱ्या अन्यायग्रस्तांना आशेचा किरण वाटतो, तिथे अन्याय करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य मिळत असेल तर मग त्या ब्रीदाचे काय ? असा सवाल त्या अर्थाने उभा होत आहे.
ठाणेदार गोपाल भारती यांच्या अवैध धंदेवाईक यांच्यासोबतच्या अर्थपूर्ण मैत्रीच्या चुरस कथा ऐकल्या तर भल्याभल्यांना आश्चर्याचा झटका बसेल पण आहे ते सत्यच.
वणी (नांदेपेरा) येथील सोनू जयस्वाल या मोठ्या दारू तस्करासह सूरज पांडे, प्रतीक सदनपवार, सलमान पठाण, निलेश शहा, गौरव बंडीवार, पिट्टु जयस्वाल, रजा शेख, नव्याने उभारलेला दारू तस्कर नीलेश बरगंट्टीवार, सुदर्शन दासरी, संजय गाढवे, सुनील देवाळकर, महेंद्र गुळवे. संजय हिवरे. गणेश रणदिवे, शेख अनवर इत्यादींची मोठी यादी अवैध दारू व्यवसायात आहे, आता यांच्या मोबाईल सोबत ठाणेदार किंव्हा ठाणेदार यांनी आपल्या वसुली मास्टर असलेल्या कर्मचारी यांच्या मोबाईल ची जर कॉल डिटेल्स काढली तर या अवैध दारू धंद्यात पोलिसांचा किती वाटा आहे हे त्वरित कळेल पण हे कोण बघेल ? हा प्रश्नच आहे. मात्र आता गडचांदूर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी नायक हे रुजू झाल्याने ते ठाणेदार गोपाल भारतीची दारू तस्करांसोबतची अभद्र युती तोडून खऱ्या नायकांची भूमिका साकारणार की ठाणेदार भारतीच्या भ्रष्टलीलातून स्वहित साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, कारण उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांचा चंद्रपूर, वणी आणि आता गडचांदूर प्रवास हा अवैध धंद्यावर अंकुश लावणारा की अभय देणारा आहे याकडे चिकित्सक बुद्धीने पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे,