Home गडचिरोली दणका :- अखेर कुरखेड्याचे भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांची बदली रद्द...

दणका :- अखेर कुरखेड्याचे भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांची बदली रद्द ?

 

सोनटक्केची बदलीसाठीची ‘फिल्डींग’ अयशस्वी ! भंडारा वन परिक्षेत्रात जाण्यास सोनटक्के होते  इच्छुक! वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रष्टाचारी सोनटक्के यांचे आर्थिक साटेलोटे उघडकीस?

कुरखेडा प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनविभागातंर्गत येणाऱ्या कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रादेशिक) सुनिल विनायकराव सोनटक्के यांचे अनेक भ्रष्टाचार पुराव्यानिशी साप्ता. भूमिपूत्राची हाक पोर्टल ने या पुर्वी उघडकीस आणले आहे, त्यावर मुख्यमंत्री व वनमंत्र्यांपर्यंत तक्रारी सुद्धा करण्यात आल्या त्यामुळे चौकश्या झाल्या आणि  सोनटक्के त्यामध्ये दोषीही आढळले.परंतु वनविभागातील वरिष्ठ अधिकान्यांशी ‘आर्थिक’ साठगांठ करून सोनटक्के यांनी भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा व स्वतःची बदली भंडारा वनविभागात करण्याचा प्रयत्न मोठ्या स्तरांवर केला खरा पण तो प्रयत्न आता  अपयशी ठरला असून त्यांची वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेली सांठगांठ मात्र या निमित्याने उघडकीस आली असून नुकतेच (प्रशासन-दुय्यम संवर्ग) अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली यांना पत्र क्र. कक्ष१०(१)आस्था/एक/प्र.क्र.२२८ (१९-२०)५६९ अन्वये मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या पत्रानुसार सन २०१९-२० या वर्षात कुरखेडा वनपरिक्षेत्रात रस्ते बांधकामाबाबत झालेल्या चौकशीत सोनटक्के यांनी लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची शक्यता वर्तविली असून तसेच त्यांची अनेक प्रकरणात चौकशी सुरू असल्यामुळे सोनटक्के यांची बदली विभागीय चौकशी दरम्यान होणे शक्य नसल्याची बाब नमुद केली आहे. तसेच होत असलेल्या विभागीय चौकशीवर सोनटक्के हे कार्यरत असल्यामुळे परिणाम होऊ शकेल अशी शक्यता ही या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.

कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक कारनामे यापुर्वी साप्ता, भूमिपूत्राची हाक ने प्रकाशित केले आहे. सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची सखोल व निष्पक्ष चौकशी झाल्यास वनविभागाच्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सोनटक्के यांचा घोटाळा उघडकीस येवू शकतो. वनविभागातील भ्रष्टाचाराच्या पैशाने ‘लबालब भरलेल्या सोनटक्के यांनी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘आर्थिक सलोख्याने गप्प बसविल्याने त्यांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी वनविभागातील काही भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी सरसावले असल्याचे बघायला मिळत आहे. सत्ताधारी शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली यांचे वनमंत्री राठोड यांना सोनटक्के यांच्या बदली संदर्भातील पत्राने संशय निर्माण झाला असला तरी महाराष्ट्राचे वनमंत्री यांची दिशाभूल करण्याचे काम वनविभागातील भ्रष्ट अधिकारी करीत आहे त्यामुळे  महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (वने) यांनी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराच्यासंबंधात विशेष चौकशी समिती नेमावी अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचेतर्फे वनमंत्र्यांना सादर केले आहे. यावर त्वरित निर्णय न घेतला गेल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे कार्यालयास समोर आंदोलन करतील असा इशारा ही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here