Home महाराष्ट्र पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे ईतिहास घडविणार ?

पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे ईतिहास घडविणार ?

 

रुपालीताई यांचा डिजिटल प्रचार युवा पदवीधर मतदारांना भुरळ पडणारा.

पुणे वार्ता :-

पुणे पदवीधर मतदार संघामध्ये मनसेच्या रुपालीताई पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, तर भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे पुण्यातील निवडणूक तिहेरी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुण्यातील शिवसेनेने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही मात्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसेनेतील मतदार हा निश्चितच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे वळता होईल अशी चिन्हे आहे तर राष्ट्रवादीचे लाड आणि भाजपचे देशमुख हे सांगलीचे असल्यामुळे पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांना सर्वात जास्त मतदार असलेल्या पुण्यातील मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे एकूणच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांचे विविध सामाजिक आंदोलन,मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे युवकांना भावनिक आवाहन आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची युवा मतदारांमधे असलेली छाप यामुळे त्या विधान परिषद मधे ईतिहास घडविणाऱ अशी शक्यता बळावली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यामध्ये आहेत. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या वेळेस सुमारे पंधरा टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची संख्या वाढली असल्यामुळे मतदानाचा टक्काही वाढण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत मोठ्या सभा होणार नसल्या तरी मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे स्वतः पुढाकार घेत असल्याने व पुण्यातील मतदारांना पदवीधर मतदारसंघ व त्यामधील आमदारांचे कर्तव्य याबाबत ते पदवीधरांना आवाहन करणार असल्याने तीहेरी लढतीत मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे ह्या मोठ्या फरकाने निवडून येण्याची चिन्हे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here