Home महाराष्ट्र राजकीय कट्टा :- पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे...

राजकीय कट्टा :- पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे ईतिहास घडविणार ?

 

राष्ट्रवादीचे अरुण लाड व भाजपचे संग्राम देशमुख या कारखानदार उमेदवाराविरोधात युवकांचा आक्रोश.

राजकीय कट्टा  :-

पुणे पदवीधर मतदार संघामध्ये मनसेच्या रुपालीताई पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, तर भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे पुण्यातील निवडणूक तिहेरी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुण्यातील शिवसेनेने भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही मात्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसेनेतील मतदार हा निश्चितच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे वळता होईल अशी चिन्हे आहे, शिवाय राष्ट्रवादीचे लाड आणि भाजपचे देशमुख हे कारखानदार असल्याने एकीकडे पदवीधर युवकांनी आक्रोश व्यक्त केला असताना दुसरीकडे ते दोन्ही उमेदवार हे सांगलीचे असल्यामुळे संख्येने जास्त संख्या असलेले पुण्यातील मतदार रुपाली पाटील ठोंबरे यांना पहीली पसंती देवू शकतात, एकूणच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांचे सामाजिक राजकीय कार्य व युवा मतदारांमधे असलेली छाप यामुळे त्या विधान परिषद मधे ईतिहास घडविणाऱ अशी शक्यता बळावली आहे.

किमान पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत तरी तरुण, होतकरू, अभ्यासक, संशोधक व सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी आणि भाजपने उमेदवारी द्यायला हवी होती मात्र त्यांनी कारखानदार व अट्टल राजकारणी यांना उमेदवारी दिल्याने मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे या उच्च शिक्षित उमेदवाराला पदवीधर मतदार पहीली पसंती देवू शकतात,

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यामध्ये आहेत. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या वेळेस सुमारे पंधरा टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची संख्या वाढली असल्यामुळे मतदानाचा टक्काही वाढण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत मोठ्या सभा होणार नसल्या तरी मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे स्वतः पुढाकार घेत असल्याने व पुण्यातील मतदारांना पदवीधर मतदारसंघ व त्यामधील आमदारांचे कर्तव्य याबाबत ते पदवीधरांना आवाहन करणार असल्याने तीहेरी लढतीत मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे ह्या मोठ्या फरकाने निवडून येण्याची संभावना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here