Home गडचांदूर धक्कादायक :- अखेर ठाणेदार गोपाल भारती यांच्या संरक्षणात गाडेगाव विरूर येथे भरला...

धक्कादायक :- अखेर ठाणेदार गोपाल भारती यांच्या संरक्षणात गाडेगाव विरूर येथे भरला कोंबड बाजार.

 

कुणीही पोलीस कर्मचारी यांनी कोंबड बाजार ठिकाणी जायचं नाही ठाणेदारांची तंबी?

पोलीस पंचनामा भाग – ९

थोड्याशा पैशासाठी शासनाने दिलेल्या खाकी वर्दीला अवैध धंदेवाईक यांच्या दावणीला बांधणाऱ्या ठाणेदार गोपाल भारती यांनी आता जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईची थोडीशीही तमा न बाळगता गाडेगाव विरूर येथे पोलीस संरक्षणात कुख्यात सट्टाकिंग हाफीज शेठ यांचा कोंबड बाजार रविवारी सुरू करण्यास मदत केली, एवढेच नव्हे तर या कोंबड बाजारात कुणीही पोलीस कर्मचारी जायचे नाही व तो बाजार बंद पाडायचा नाही अशी तंबी सुद्धा ठाणेदार गोपाल भारती यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्याने अवैध धंदेवाईक यांच्यासोबत ठाणेदार यांचे काय सबंध असतील हे त्वरित लक्षात येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांवर धाड टाकणारी एलसीबी पोलीस ही कोंबड बाजाराची संपूर्ण माहिती असताना नेमकी आहे तरी कुठे ? हे पण समजायला मार्ग नाही.

गाडेगाव विरूर येथे रविवारी ठाणेदार गोपाल भारती यांच्या संरक्षणात भरलेल्या कोंबड बाजाराला जुगार खेळणारे, झेंडीमुंडी खेळणारे, कोंबडे झुंडीत सट्टा लावणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती, या कोंबड बाजारात चिकन मटण बिर्याणी चा आस्वाद सुद्धा उपस्थितांना थंड पाण्यासह मिळाला, या कोंबड बाजाराला आयोजित करण्यासाठी ज्या ज्या वीभुतींचे योगदान लाभले त्यात महत्वाचे योगदान अर्थात ठाणेदार गोपाल भारती यांचे होते, कारण त्यांच्याच संरक्षणातच शेकडो लोकांच्या साक्षीने हा कोंबड बाजार भरला होता, याचे प्रमुख आयोजक वणी येथील कुख्यात सट्टाकिंग हाफीज शेठ होते तर त्यांच्या दिमतीला गडचांदूर येथे मिरविनारे काही स्वयंघोषित नेतेमंडळी होती, ती कोण होती ? त्याचा परिचय होणारच आहे पण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व एलसीबी चे ठाणेदार यांची ठाणेदार गोपाल भारतीच्या या परवानगीला साथ होती का ? जर नसती तर कोंबड बाजारावर धाड का पडली नाही? आणि जर असेल तर मग कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडली आहे का ? याचे उत्तर जनता त्यांना मागणार आहे. कारण “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या पोलीस ब्रीद वाक्याला पोलिसांनीच हड़ताळ फासला असेल तर मग ? सर्वसामान्यांना कायद्याचा धाकच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here