Home भद्रावती क्राईम स्टोरी :- दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेनी आवळल्या?

क्राईम स्टोरी :- दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेनी आवळल्या?

 

पोलीस कार्यवाहीत ०४ आरोपीतांसह ३ लक्ष ४१ हजाराचा मुददेमाल हस्तगत

भद्रावती प्रतिनिधी :-

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई भद्रावती येथे दिनांक १५/११/२०२० रोजी झाली असून स्थानीक गुन्हे शाखेचे पधक पोलीस स्टेशन भद्रावती परिसरात पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे एक इसम ज्याचे नाव आनंद विश्वकर्मा आहे तो होडा अॅकटीवा गाडीने सुमठाना भद्रावती परिसरात संशयास्पदरित्या फिरत असुन त्याचे जवळ असलेली गाडी ही चोरीची आहे.अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी पोहचुन सदर इसमास ताब्यात घेतले व त्यास विचारपुस केली असता त्याने कबुली दिली की, त्याचे ताव्यातील गाड़ी होंडा अॅक्टोया क. एमएच ३४ बीएम ९६९४ ही त्याने त्याचे साथीदारासह पोलीस स्टेशन वरोरा हददीतुन सन् २०१८ मध्ये चोरी केली होती, यावरून सदर आरोपी नामे आनंद विश्वकर्मा याला ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आणि त्याचे साथीदाराने या गाडी व्यतीरीक्त चंद्रपुर आणि इतर जिल्हयातुन सुध्दा दुचाकी गाड्या चोरी केल्या असल्याचे सांगितले.

सदर आरोपी इसम आणि आणि त्यांचे इतर तिन साथीदार यांचे कडुन पोस्टे वणी येथील १)होडा अॅक्टीवा २)होडा शाईन, पोस्टे यवतमाळ येथील ३)वजाज पल्सर, पोस्टे सोनगाव नागपुर येथील ४) बजाज डिस्कवर, पोस्टे रामनगर येथील ५) टिव्हीएस स्कुटोपेप, पोस्टे वरोरा येथील ६) होडा अंक्टीवा, आणि ०१ हिरो पंशन प्रो. ०१ होडा स्पलेंडर, ०१ हिरो पंशन प्रो पलस असे एकूण ०९ दुचाक्या गाड्यांचा मुद्देमाल किं. ३,४१,०००/- चा हस्तगत करण्यात आला आहे. सदर एकुण ४ आरोपी नामे १)गौरय गजानन वितांवार वय २१ रा. भद्रावती ०२) अनिकेत प्रमोद लांडगे वय २३ रा, खांबाळा, ३) आनंद जयप्रकाश विश्वकर्मा वय २५ रा. सुमठाणा भद्रावती. ४) रातुल लक्ष्मण राम य २१ रा. सुमठाणा भद्रावती यांना पोलीस स्टेशन वरोरा येथे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पोलीस निरिक्षक खाडे यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, सफा, पंडीत वन्हाटे, पोना मनोज रामटेके, पोना गजानन नागरे, पोशि. विनोद जाधव, पोशि. सुरेंद्र महतो यांनी पार पाडली.

Previous articleधक्कादायक :- अखेर ठाणेदार गोपाल भारती यांच्या संरक्षणात गाडेगाव विरूर येथे भरला कोंबड बाजार.
Next articleधक्कादायक :- चंद्रपूर मनपा सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे यांचा भ्रष्ट कारनामा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here