Home चंद्रपूर खळबळजनक :- खासदार धानोरकरांची वाराणसीत जाऊन लढायची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली ?

खळबळजनक :- खासदार धानोरकरांची वाराणसीत जाऊन लढायची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली ?

 

व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या नेटकऱ्यांनी परिवाराला घेरल्याने धानोरकर समर्थक चिंतेत?

लक्षवेधी :-

देशात शेतकरी मोदी सरकारच्या क्रुषि कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अजूनपर्यंत काहीच मार्ग निघतांना दिसत नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारच्या या आडमुठेपणावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी काल नागपुरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपवर टीका केली होती.अर्थात दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन किती काळ सुरु राहणार याबद्दल कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून अडाणी अंबानी या कार्पोरेट घराण्याचा विचार करत आहे. म्हणूनच काल नागपुरात राजभवनावर काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या आंदोलना दरम्यान बोलताना खासदार बाळू धानोरकर यांनी मोदींचा ट्रम्प करू असं विधान केलं होतं शिवाय  ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्याचप्रमाणे मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान देत महाराष्ट्रात एकमेव काँग्रेसचे खासदार असलेल्या बाळू धानोरकर यांनी पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे असे विधान केले सोबतच ते म्हणाले की आता तीन वर्ष बाकी आहेत. जर मोदींचा ट्रम्प केला नाही तर नावाचा बाळू धानोरकर नाही,

खरं तर बाळू धानोरकर यांना असे विधान करण्याचा संविधानाने अधिकार दिला, त्यामुळे ते जे बोलले त्यांवर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही, पण फेसबुकवर सकाळ पोर्टल ने टाकलेली बातमी ही मोदी भक्तांना झोंबणारी ठरली आणि त्यांनी या बातमीवर ट्रोल करणे सुरू केले, त्यात त्यांनी त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली पण सोबतच त्यांच्या आमदार असलेल्या पत्नीला पण सोडले नाही, परंतु महत्वाची बाब म्हणजे त्या ट्रोलला खासदार बाळू धानोरकर यांच्या कुठल्याही समर्थकांनी उत्तर दिले नाही किंव्हा मोदी भक्तांना आव्हान केले नाही, त्यावरून खासदार बाळू धानोरकर यांचे समर्थक नाही का ? किंव्हा त्यांची राजकीय प्रतिमा घटली का ? असे प्रश्न उभे राहत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी इथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विकली जाते आणि ही अवैध दारू खासदार बाळू धानोरकर यांच्याच माध्यमातून जिल्ह्यात येत असल्याची व ते प्रत्त्येक दारूच्या पेटीमागे कमिशन घेत असल्याची चर्चा आहे, अर्थात हा झाला त्यांचा धंदा पण ज्या पद्धतीने त्यांच्या एकूण चरीत्र्यावर शिंतोडे नेटकऱ्यांच्या माध्यमातून उठवले गेले ते त्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे.

काय म्हणाले नेटकरी? ते वाचा.

“गांजा जास्त नको घेऊ बाबा.

यांची दारू ची खूप दुकाने आहेत म्हणतात, चंद्रपूर जील्ह्यात.बहूतेक एखाद्या ठिकाणी भेट दीली वाटते.

काँग्रेस तुम्हाला तिकीट देणार नाहीत वाटतं….म्हणून चाललय सगळं😂😂😂

तुझी औकात काय गप्पा मारतो काय परत चंद्रपुरात निवडून येतोय का बघ तु हुरररररल

नागडा झाला आहे का बे?

असेच बोलुन मनोरंजन करत जा

इतकी पण नाही ढोसली पाहिजे.
हे वक्तव्य जास्त झाल्यावर केलेल दिसतय.
जा जाऊन झोप मुर्खा.

मुळात तू चुकून निवडून आला आहे,

बाळू तू चपटी पिऊन झोप कि घरी मर्दा ..कशाला येड्यावानी करतोय.😂😂🤣😂

घ्यावी….पण एवढी कडक ? पाणी टाकत चला..☺️

अरे भाऊ फक्त मतदार संघ सांभाळायच बघा 2024,ला चड्डी फिटुस्तर पळाल लागल कशाला काशीला जायच.

अबे बाळ्या पाहिले तू तुझ्या बायकोवर लक्ष ठेव🤣🤣🤣लय ऐकलं आहे तुझ्या बायकोबद्दल.

वरील सर्व ट्रोल हे मोदी भक्तांचे असले तरी खासदार बाळू धानोरकर यांच्या आमदार असलेल्या पत्नी बद्दल जे ट्रोल झाले त्यामुळे त्यांचे समर्थक चिंतेत आहे पण, त्यांवर खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांनी तत्काळ उत्तर देवून त्यांची बाजू का राखल्या गेली नाही हा चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न आहे, कारण कुण्याही एका महिला आमदार व्यक्तीच्या चारीत्र्यावर अशा प्रकारचे लांछन लावणे योग्य नाही आणि कुणाच्या व्यक्तिगत जीवनातील घटना सार्वजनिक करणे सुद्धा योग्य नाही. या निमित्याने एवढी गोष्ट मात्र खरी की खासदार बाळू धानोरकर स्वतःच्या मतदार संघात निवडून येवो अथवा न येवो पण ज्या पद्धतीने त्यांच्या बाजूने मोदी भक्तांच्या ट्रोल ला कुणी आव्हान केले नाही यावरून खासदार बाळू धानोरकर यांची राजकीय प्रतिभा कमी झाली का ? हा प्रश्न या निमित्याने उभा राहत आहे.

Previous articleधक्कादायक :- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरूच,
Next articleधक्कादायक ;- राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली याचे उत्तर अनेकांना माहित नाही ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here