Home चंद्रपूर सनसनीखेज :- महेश मांढरे ह्या पोलिसांच्या सहकार्याने गोरख गुप्तांनी आपल्या सख्ख्या भाच्याला...

सनसनीखेज :- महेश मांढरे ह्या पोलिसांच्या सहकार्याने गोरख गुप्तांनी आपल्या सख्ख्या भाच्याला 36 लाखांनी गंडवले ?

 

आताही कंस मामा जिवंत असल्याचा जळजळीत पुरावा ठरला गोरख गुप्ता.

घूग्गूस न्यूज नेटवर्क.

द्वापर युगात श्रीकृष्ण जन्माला आला आणि त्यांनी आपल्या सख्ख्या मामाच्या सैतानी क्रूत्याचा अंत केला, पण आता कलियुगात सुद्धा असे अनेक सैतानी मामा खुलेआम फिरत असून आपल्या सख्ख्या भाच्याची तब्बल 36 लाख रुपयानी आर्थिक फसवणूक करून आजही कंस मामा जिवंत असल्याचा जळजळीत पुरावा घुगुस येथील गोरख गुप्ता यांनी समाजासमोर उभा केल्याने या घटनेमुळे सामजिक मन सुन्न झाले आहे. विशेष म्हणजे त्या कंस मामाला घूग्गूस पोलीस स्टेशन मधील महेश मांढरे नामक पोलीस कर्मचारी साथ देत असल्याने बिचाऱ्या संजय गुप्ता ह्या भाच्यावर जणू आभाळ कोसळल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार संजय गुप्ता हा अल्पवयीन असल्याने त्यांच्या वडिलांनी मामा गोरख गुप्ता ह्याला सुरुवातीला जवळपास ११लाखांपेक्षा जास्त पैसे ऑनलाईन बैंकिंग द्वारे पाठवले त्या पैशातून गोरख गुप्तांनी स्वतःच्या नावे हायवा ट्रक घेतला तो ट्रक चालला  त्याच्या कमाई ची रक्कम तर त्यांनी स्वाहा केलीच शिवाय दुसऱ्या एका हायवा ट्रक जो त्याच्या कडे भाचा संजय ने दिला त्याच्या कमाई ची रक्कम सुद्धा मामा गोरख गुप्तांनी हडपली आणि भाचा संजय गुप्ता याला आपल्या घराबाहेर काढून दिले दरम्यान संजय गूप्ताचा भाऊ कैँसर ने मरण पावला पण मामा गोरख गुप्तांनी त्याच्यावर असलेले पैसे दिले नाही शिवाय संजय चे  वडील मरण पावले पण  तेंव्हा सुद्धा कंस मामा ला पाझर फुटला नाही आणि आता तर चक्क तब्बल ३६ लाख रुपये नाही देत जे करायच ते  कर असे म्हणून मामा गोरख गुप्तांनी भाचा संजय ला गरिबी च्या खाईत टाकले आहे.

कंस मामा गोरख गूप्ताच्य घरी घूग्गूस पोलीस स्टेशन चा पोलीस शिपाई महेश मांढरे हा किरायाने राहतो त्यामुळे पुन्हा हत्तीचे बळ आलेल्या कंस मामा गोरख ने चक्क भाचा संजय गुप्ता ला जीवे मारण्याची धमकी देऊन दोन वेळा हल्ला करण्याचा  प्रयत्न सुद्धा केला दरम्यान संजय गुप्ता ने घूग्गूस पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली आहे पण पोलीस महेश मांढरे यांच्यामुळे आरोपी गोरख गुप्ताचा बचाव होत आहे हे प्रकरण आपसी लेनदेनच असल तरी कुणावर असला अन्याय व्हावा हे कदापिही समाज हिताचे नाही त्यामुळे पोलीस निरीक्षक यांनी या संदर्भात प्रयत्न करून कंस मामा गोरख गुप्ता कडून भाचा संजय गुप्ता वर जो अन्याय झाला व जे पैसे आहेत ते त्याला मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न करावे अशी आर्त हाक संजय गुप्ता व त्याच्या छोट्या मुलांकडून दिल्या जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here