Home क्राईम स्टोरी धक्कादायक :- महिलेला विवस्त्र करून केली मारहाण ?पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह?

धक्कादायक :- महिलेला विवस्त्र करून केली मारहाण ?पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह?

 

नारी शक्ती महिला संघटनेची पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढत असून पोलीस प्रशासन या संदर्भात गंभीर दिसत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, एका महिलेला विवस्त्र करून तिला बेदम मारहाण केल्यानंतर देखील पोलीसानी आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले नसल्याने नारी शक्ती महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेवून या संदर्भात करवाई करण्याची मागणी केली आहे.

19 मार्चला मुक्ती कॉलनी परिसरात विटा टाकण्याच्या क्षुल्लक कारणातून 2 महिलांना पावडा व हातोड्याने सतीश रॉय व सुजित रॉय यांनी पावडा व हातोड्याने रीमा बोन्डे व दीपिका बिश्वास या दोघा महिलांना बेदम मारहाण करण्यात आली, मात्र या गंभीर प्रकरणात पोलिसांचा बेजबाबदारपणा बघायला मिळाला असून पोलीस आरोपींवर गुन्हे दाखल करायला सुद्धा मागे पुढे बघत असल्याचे बोलल्या जात आहे त्यामुळे
महिलांना विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या रॉय बंधूवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नारी शक्ती महिला संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना करण्यात आली, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ या गंभीर प्रकरणाची दखल घेत तात्काळ गुन्हे दाखल करून चौकशी करण्याचे निर्देश रामनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना केली. यावेळी अध्यक्ष सुनीता गायकवाड, उपाध्यक्ष सायली येरने,सचिव ऍड विना बोरकर,संतोषी चौहान, अर्चना आमटे,अल्का मेश्राम,पूजा शेरकी,रूपा परशराम,प्रतिभा लोनगाडगे,माला पेदाम,गीता येडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here