Home क्राईम स्टोरी क्राईम न्यूज :- राजु यादव हत्त्या प्रकरणी संशयीत आरोपीवर पोलिसांची रणनीती काय...

क्राईम न्यूज :- राजु यादव हत्त्या प्रकरणी संशयीत आरोपीवर पोलिसांची रणनीती काय ?

 

राजू यादव परिवाराला मोकाट असलेल्या त्या आरोपी पासून धोका?

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

कोळसा ट्रांसपोर्टर राजू यादव यांच्या हत्त्या प्रकरणी चंदन सिंह, सतेंद्रकुमार परमहंससिंग या दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली पण त्यांच्याकडून इतर आरोपी जे या राजू यादव हत्तेच्या कटात सहभागी होते त्यांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले नाही की जाणीवपूर्वक त्यांनी संशयित आरोपींना मोकाट सोडले हा संशोधनाचा विषय ठरत आहे. कारण ज्याअर्थी राजू यादव यांच्या परिवाराने त्या दोन आरोपी सोबतच झुल्लूर पाठक, मनिश शर्मा, गुडू टायरवाला, अनिल झाँ, मनोज शर्मा इत्यादी आरोपींवर सुद्धा त्या हत्त्याकांड कटात सहभाग असल्याचा पोलीस बयान आहे शिवाय हत्तेच्या ठिकाणी सीसीटीवी फुटेज मधे वरील संशयित आरोपी पैकी दोन आरोपी हजर असल्याचे दिसत आहे. मग पोलीसांनी त्या आरोपींना अटक का केली नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.

खरं तर आपल्याला अटक होऊ शकते या भीतीने झुल्लूर पाठक, मनिश शर्मा, गुडू टायरवाला, अनिल झाँ, मनोज शर्मा हे फरार असून अधून मधून राजुरा बल्लारपूर परिसरात ते दिसतात तर मग जेंव्हा राजू यादव परिवारातील सदस्यांनी या सर्वावर हत्त्या कांडात सहभागी असल्याचा दावा केला व त्यांना सुद्धा माहीत आहे की ते आरोपी आहेत तर मग पोलीस कशाची वाट बघताहेत हेच कळत नाही घटनेच्या वेळी सर्व आरोपींचे cdr काढण्याला किती वेळ लागतो ?त्यांचे लोकेशन त्यावेळी कुठे होते यासाठी किती वेळ लागतो? याबद्दल एक्सपर्ट च्या माहितीनुसार घटनेनंतर आतापर्यंतचा काळ हा फार झाला आहे पण पोलीसांनी मात्र तपासात काय साध्य केलय हे अजूनही गूलदस्त्यात आहे की पुढे या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याच्या नावाखाली दोषारोपपत्र उशिरा सादर करून हे प्रकरण कमजोर करण्याचा डाव आहे याबद्दल शंका यायला लागली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने चालविला असल्याने संशयित आरोपी कडून राजू यादव परिवाराच्या जिवाला धोका असल्याची तक्रार राजू यादव यांच्या मुलांने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करून त्यांना पोलीस सरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली होती परंतु या प्रकरणी अजूनपर्यंत संशयित आरोपींना पोलीस पकडू शकले नाही किंव्हा राजू यादव परिवाराला पोलीस सरक्षण सुद्धा देऊ शकले नाही त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Previous articleधक्कादायक :- महिलेला विवस्त्र करून केली मारहाण ?पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह?
Next articleसन्मान :- सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू ह्या नेशनल ह्यूमन राईट ऑर्गनायजेशन अवार्डने सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here