Home क्राईम स्टोरी अभिनंदनिय:- बलात्काराच्या प्रकरणातील निकाल अवघ्या ४१ दिवसात?

अभिनंदनिय:- बलात्काराच्या प्रकरणातील निकाल अवघ्या ४१ दिवसात?

 

न्यायालयाच्या जलदगती निर्णयाने पोलीस प्रशासनासह न्यायाधीशांचे सर्वत्र अभिनंदन.

क्राईम ब्लास्ट:-

आजवर पीडितांना न्याय मिळत नाही बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही म्हणून मोर्चे आंदोलने आपण बघितले असेल पण काही न करता पोलीस प्रशासनापासून तर न्याय व्यवस्थेपर्यंत सर्वानी जर मनात आणल तर निकाल कसा लवकर लागतो हे नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाल आहे.

प्रकरण असे आहे की दिवशी बु (ता. भोकर) येथील एका 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी मंगळवारी (दि. 23) फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने अवघ्या 41 दिवसात या प्रकरणात न्याय निवाडा केला असल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.बाबुराव माळेगावकर ऊर्फ बाबुराव उकंडू सांगेराव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे 20 जानेवारी सालगडी असलेल्या आरोपीने 5 वर्षीय बालिकेस गावातीलच कोरड्या नदीपात्रात नेवून तेथे अमानुष अत्याचार करुन हत्या केली होती. याबाबत मयत चिमुकलीच्या वडिलांनी भोकर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी सालगडया विरोधात हत्या आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 19 दिवसात तपास पूर्ण करून 10 फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने 39 जणांची साक्ष तपासून तसेच वैद्यकीय पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड रमेश राजुरकर यांनी काम पाहिले आहे.

Previous articleशोकांतिका :- आपल्या सख्ख्या मुलासह नातवाला घराबाहेर काढणाऱ्या त्या आई वडिलांना काय म्हणायचे?
Next articleसनसनीखेज :- महेश मांढरे ह्या पोलिसांच्या सहकार्याने गोरख गुप्तांनी आपल्या सख्ख्या भाच्याला 36 लाखांनी गंडवले ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here