Home Breaking News शोकांतिका :- आपल्या सख्ख्या मुलासह नातवाला घराबाहेर काढणाऱ्या त्या आई वडिलांना काय...

शोकांतिका :- आपल्या सख्ख्या मुलासह नातवाला घराबाहेर काढणाऱ्या त्या आई वडिलांना काय म्हणायचे?

 

संपतीच्या नादात नाते विसरलेल्या त्या झोटिंग परिवाराची अजब कहाणी. न्यायालयात फैसला होणार?

लक्षवेधक :-

संस्कृत मधे अशी ओळ आहे की ‘कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति। अर्थात पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण आई कधी वाईट होऊ शकत नाही, त्यात हिंदी मधे असे म्हटल्या गेले की “जगदम्बा जब किसी भी नर-नारी पर प्रसन्न होती है तो उसे हर प्रकार से सुखी व संपन्न बना देती है। अगर मां रुष्ट हो जाए तो घर के सब सुख छीन भी लेती है। अगदी असाच प्रकार झोटिंग परिवारातल्या सदस्यांमध्ये सुरू असून आपल्या सख्ख्या पोटच्या मुलाला व लहान नातवाला घराबाहेर काढण्याचे नानाविध छडयंत्र स्वतः आई रचत असल्याची चिंतनिय बाब समोर आली असून आपली खुन्नस काढण्यासाठी आपल्या मुलाला व नातवाला पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या दरात उभे करण्यात आई अग्रेसर असल्याची धक्कादायक कहाणी समोर येत आहे. आणि यामुळेच झोटिंग परिवार अस्ताव्यस्त झाल्याचे दिसत आहे.

कहाणी खूप चिंतनिय आणि समाजाला चिंतन करायला लावणारी असून आई च्या आई कडे म्हणजे आजी कडे शशांक झोटिंग हा तिच्या सेवेसाठी राहत होता दरम्यान त्याचे लग्न झाले व त्याची पत्नी सुद्धा त्या म्हाताऱ्या आजीची सेवा करायची दरम्यान शशांकने आपला छोटासा व्यवसाय आपल्या आजीच्या घराच्या वरच्या छतावर सुरू केला आणि आजीसाठी एक कार खरेदी केली पण शशांक चा मोठा भाऊ अतुल ज्यांचा व्यवसाय चांगला चालतोय आणि तो नागपूर ला राहतो त्याच्या मनात हे खटकले आणि त्यानी आई बाबांना भडकावून आजी च्या घरी राहत असलेल्या आपल्या भावाला दूर करण्याचा प्रयत्न चालवला असे शशांक चे म्हणणे आहे, खरं तर शशांक चे आई वडील हे दोघेही शिक्षक म्हणून सेवानिवृत्त आहे व त्यांना महिन्याकाठी जवळपास ५० ते ६० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळत आहे आणि त्यांची शेतजमीन व हिंगणघाट येथे घर आहे पण शशांक ला आईची म्हणजे आजीची संपती मिळू नये म्हणून आई ने कट कारस्थान रचले व शशांक व त्यांच्या पत्नी व नातवाला बाहेर काढण्यासाठी चक्क आजीला ज्या आजीची सेवा शशांक ने केली तिला त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मधे खोट्या तक्रारी करायला लावून व जेष्ठ नागरिकांच्या हक्का संदर्भात एक केस उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात टाकून शशांक व त्याच्या परिवाराला घराच्या बाहेर काढण्याचे कट कारस्थान रचल्या गेले आहे,

आता न्यायालयाचा जो निर्णय येईल तो येईल मात्र एक आई मुलाची वैरीन कशी असू शकते व वडील सुद्धा मुलाच्या संसाराला रस्त्यावर कसे आणू शकते? हे आश्चर्यच असून आपला मुलगा बदमाश व्यसनी जरी असला तरी आई आपल्या मुलाला बाहेर कधी हाकलत नाही पण इथे तर चक्क मुला सोबतच सून व दहा वर्षाच्या नातवाला सुद्धा बाहेर हाकलच्या प्रयत्न आई वडिलांकडून होत असल्याने त्यांना नेमक काय म्हणायच ? आणि कुठली उपमा द्यायची? हा प्रश्न सामजिक आरोग्याच्या द्रुष्टीने अतिशय गंभीर आहे असे दिसते. इकडे लॉक डाऊन च्या काळात रोजगार गेल्याने शशांक वर आर्थिक संकट आहे मित्रांकडून काही पैसे मिळवून तो आपल्या संसाराचा रेटा चालविण्याचा प्रयत्न करतोय पण वकिलांना फी देण्यासाठी त्याचेकडे पैसे नसतांना शिवाय आपल्या मुलाची शैक्षणिक फी देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही त्याची पत्नी खाजगी शाळेत अल्पशा पगारा वर शिकवते त्यातून त्यांचे घर  चालते पण एवढे दारिद्रय आपल्या मुलावर आल असताना आई वडील मात्र पुन्हा त्याच्यावर सगळीकडून दबाव आणून घराच्या बाहेर करण्याचा प्रयत्न करताहेत हे बघून कुणीही चिंता व्यक्त करेल पण आई वडिलांना याची तमा नसावी म्हणजे कलियुगात असेही आई वडील असतात का? ही शोकांतिकाच आहे. आता जर शशांक ने आई वडिलांच्या या  त्रासाला कंटाळून काही बरं वाईट केल तर आई वडिलांना चिंता होईल की नाही? हा संशोधनाचा विषय राहणार आहे.पण समाजाच्या न्यायालयात आई वडिलांना मात्र सजा होईल एवढे मात्र खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here