Home चंद्रपूर धक्कादायक :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी महाजनको च्या गेस्ट हाऊस मधे...

धक्कादायक :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी महाजनको च्या गेस्ट हाऊस मधे भोजनाला?

 

जिल्ह्यातील महाजनकोच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाच्या बदल्यात मेजवानी?

चंद्रपूर न्यूज नेटवर्क

चंद्रपूर महाऔष्णिक विद्दूत केंद्र अर्थात महाजनको च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून या संदर्भात पर्यावरण सरक्षण कार्यात काम करणाऱ्या अनेक संस्थानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड याकडे तक्रारी केल्या, मात्र जिथे कुंपणच शेत खात असेल तिथे त्या शेताच सरक्षण कोण करणार? अगदी अशीच परिस्थिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड अधिकारी यांची झाली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड चंद्रपूर यांच्याकडे ctps या उद्दोगासह जिल्ह्यातील उद्दोगाच्या प्रदुषनासंदर्भात आलेल्या तक्रारी म्हणजे त्यांचे आर्थिक संधीचे स्त्रोत समजून त्यांच्या मार्फत उगाच एक नोटीस चा फार्स पार पाडल्या जाऊन मग आपल्या तुंबड्या भरण्याचे काम अविरतपणे सुरू असते,याचा प्रत्यय आता आला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड चे अधिकारी यांच्याकडे ctps अर्थात महाजनको यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणाच्या संदर्भात तक्रारी आहे, शिवाय the national green tribunal च्या अध्यक्ष याकडे सुद्धा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय व उपप्रादेशिक अधिकारी ज्या कंपन्यांवर करवाई करायची आहे त्यांच्या अधिकाऱ्यासोबत कंपनी च्या रेस्ट हाऊस मधे भोजन करीत असेल तर दाल मे कुछ काला है असे दिसत आहे.

Previous articleशैक्षणिक :- वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल विरोधात पालकांचा एल्गार.
Next articleशोकांतिका :- आपल्या सख्ख्या मुलासह नातवाला घराबाहेर काढणाऱ्या त्या आई वडिलांना काय म्हणायचे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here