ऑनलाईन शिकवणीची एवढी फी कशासाठी? पालकांचा सवाल.
वरोरा प्रतिनिधी:-
महाराष्ट्रात कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात संस्था चालकांच्या मनमानी फी वसुलीच्या कारभारामुळे पालकांवर्ग चिंतेत असून ऑनलाईन क्लासेस च्या नावाखाली सक्तीची फी वसुली पालकांकडून होत असल्याने पालक आता रस्त्यांवर उतरले असल्याचे बघावयास मिळत आहे अशाच पद्धतीचा आक्रोश संस्था चालकांच्या फी वसुली संदर्भातील वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल प्रशासनाविरोधात पालकांचा सुरू असून या संदर्भात मुख्याध्यापक नेमकी काय भूमिका घेणार यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे.
संस्कार भारती पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याचे
पालकांच्या म्हणण्यानुसार वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी यांचे फक्त ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू आहेत व इतर कोणतेही शालेय शिक्षण सुरू नसल्यामुळे पालक वर्ग शालेय वार्षिक फी पुर्ण कशी भरणार ? या मागणीला येवून पालक वर्गानी जनआक्रोश मोर्चा काढला. ऑनलाईन शिकवणी मधे कधी कधी नेटवर्क, नसल्यामुळे काहीच समजत नाही. गरीब पालकांना मोबाईलचा दहा ते पंधरा हजार रुपये चा भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी पण पालक वर्ग ५० टक्के फी टक्के भरायला तयार आहे, काही पालकांनी तर एक एक हप्ता फी सुध्दा भरली आहे. संस्कार भारती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य याना ५० टक्के सुट मिळवण्यासाठी तिन निवेदन देण्यात आले पण त्यानी प्रत्येक वेळी उठवाउडविचे उत्तर देऊन टाळाटाळ केली आहे त्यामुळे पालक संतप्त होऊन दि. २० मार्च ला २०२१ ला संस्कार भारती पथिक स्कूल विरोधात दिडशे ते दोनशेहून अधिक पालक वर्ग एकत्र येऊन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला व प्राचार्य याना भेटुन शालेय वार्षिक फी मध्ये ५० टक्के सुट मिळण्याबाबत चर्चा करून पुन्हा निवेदन देण्यात आले. यावर प्राचार्य यांनी मेनेजमेंटशी थेट चर्चा करून दोन ते तिन दिवसात निर्णय देण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु संस्कार भारती पब्लिक स्कूल व्यवस्थापणाच्या ह्या शक्तीच्या फी संदर्भात पालकांचा एल्गार चिंताजनक असून यामधे शिक्षणाधिकारी यांनीमध्यस्थी करून तोडगा काढणे आवश्यक आहे.