Home राष्ट्रीय राजकीय कट्टा :- पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाने मोदींच्या बदलाचे वारे?

राजकीय कट्टा :- पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाने मोदींच्या बदलाचे वारे?

 

“राजतिलक की करो तयारी आ रहे है नितीन गडकरी”चा नारा बुलंद होण्याची चिन्हे?

राजकीय कट्टा :-

आठवडा उलटला तरी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाचे कवित्व सुरूच आहे. मोदी सरकारच्या विरोधकांनी त्यावरून भाजपला पुरतं घेरलं आहे. या निवडणुकीत ‘खोटा प्रचार व बदनामी ही निवडणुकीतील शस्त्रं घेऊन ज्या पद्धतीने मोदी शहानी पश्चिम बंगालच्या जनतेला भुरळ पडण्याचा प्रयत्न केला तो मोदी शहाच्या अंगलट आल्याने येणाऱ्या काळात या जुनाट व बोथट झालेल्या शास्त्राचा वापर चालणार नाही आणि मोदी शहा कडे जनतेला आकर्षित करण्यासारखे असे काही नाविन्यपूर्ण उरले नाही त्यामुळे जर भाजप ला या देशात आपली सत्ता टिकवायची असेल तर देशाचे नेत्रूत्व भाजप चे सर्वमान्य नेते व विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे नितीन गडकरी यांच्याकडे देणे गरजेचे आहेत असे भाजप च्या जुन्या जाणत्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना वाटत आहे.

खरं तर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय यश अपयशाची तुलना झाल्याने पंतप्रधान मोदींची राजकीय ताकत कमी झाली आणि त्यामुळेच मोदी-शहा हरले, कारण ‘नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पण निवडणूक काळात त्यांनी स्वतःला ममता बॅनर्जी यांच्या बरोबरीत आणून ठेवलं. अर्थात सर्वोच्च नेते म्हणून ते वागले नाहीत. त्यामुळं बंगालच्या लोकांना मोदींचं अप्रूप वाटलं नाही व ममतांसमोर उभ्या राहिलेल्या मोदींचा पराभव झाला,’ असं जाणकारांच मत आहे. शिवाय पश्चिम बंगालच्या जनतेला ‘जय श्रीराम’चा नारा व धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. कारण तेथील जनतेला आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर प्रेम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहाने प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार व बदनामी ही शस्त्र उपसली व देशातील राजकीय संस्कृती व परंपरा मोडली, याचा फटका त्यांना बसला. शिवाय प्रचाराच्या काळात मोदी-शहांच्या सभांना व रोड शोना झालेली गर्दी स्थानिक नव्हती. झारखंड, बिहार, ओडिशा या बंगालच्या सीमेवरील राज्यांतून रोज गर्दी विकत आणली जात होती, ‘पश्चिम बंगालात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर रोजीरोटीसाठी आले आहेत. ‘जय श्रीराम’च्या गर्जनेचं त्यांना आकर्षण वाटलं. पण ममतांनी या हिंदी भाषिक मतांकडं पूर्ण दुर्लक्ष करून स्थानिकांना भावनिक साद घातली. बाहेरचे लोक येऊन बंगाल बिघडवत आहेत ते रोखायला हवे, हा मुद्दा त्यांनी लावून धरला. बंगालचा आम्ही गुजरात होऊ देणार नाही, असंही त्या सांगत राहिल्या. त्यामुळे राज्याची भाषिक अस्मिता पश्चिम बंगाल च्या जनतेनी जपली आणि मोदी शहाना धूळ चारली.

आता ही गोष्ट स्पष्ट झाली की ‘मोदी किंवा शहांनी कितीही ताकद लावली तरी त्यांचा पराभव होऊ शकतो हे प. बंगाल, केरळ व तामीळनाडूनं दाखवून दिलं. मोदी हे जेवढे लोकप्रिय आहेत तेवढेच ते जनतेला खोटी आश्वासने देऊन बदनाम सुद्धा झाले आहेत, लहाणच्या मुलांपासुन तर म्हाताऱ्या पर्यंत त्यांची राजकीय छबी ही खोटारडा पंतप्रधान म्हणून निर्माण झाली आहे. जर येणाऱ्या काळात त्यांच्याकडे भाजप ची संपूर्ण धुरा दिली तर भाजप चे अस्तित्व टिकणार नाही आणि सुसंस्कृत म्हणून जी छबी एवढ्या वर्षात भाजपने निर्माण केली ती संपून जाईल आणि भाजप हा पक्ष खोटारडा पक्ष आहेत अशी नावे जनता देईल त्यामुळे भाजपला नेत्रूत्व परिवर्तन करणे आवश्यक झाले आहेत असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

“राजतिलक की करो तयारी आ रहे है नितीन गडकरी”चा नारा होनार बुलंद?

देशात मोदींना भाजप मधे केवळ आणि केवळ नितीन गडकरी हेच पर्याय आहेत याबद्दल पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर प्रतिक्रिया देतांना म्हटले की मोदी देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असल्याने देशाचे कोरोना परिस्थिती हाताळण्याचे नेत्रूत्व हे नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावे, अर्थात जर ही भूमिका एका खासदाराची आहे तर देशातील असंख्य खासदारांसोबत नितीन गडकरी यांचे मधुर सबंध आहेत आणि नितीन गडकरी यांची देशव्यापी छबी ही विकास पुरुष म्हणून असल्याने शिवाय इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले सबंध असल्याने त्यांच्याकडे भाजपचे नेत्रूत्व आल्यास भाजप ला पुन्हा देशात सुवर्णकाळ असेल असे राजकीय विश्लेषकांना वाटते. अर्थात नितीन गडकरी यांच्याकडे भाजप चे सूत्र गेल्यास देशात नवी हरित क्रांती सुद्धा येऊ शकते त्यामुळे “राजतिलक की करो तयारी आ रहे है नितीन गडकरी” हा नारा बुलंद झाल्यास नवल वाटू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here